shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई सेवा मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन साजरा*

*साई सेवा मतिमंद विद्यालयात दिव्यांग दिन  साजरा* 
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
आज रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी आधार शिक्षण व ग्रामिण विकास मंडळ संचलित, साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे  जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग दिनानिमित्त शिर्डी शहरात मतदार जनजागृती रॅलीच आयोजन करण्यात आले. दिव्यांग दिनानिमित्त व मतदार जनजागृती निमित्त शिर्डी बस स्थानक आगार प्रमुख श्री बनकर साहेब यांनी सर्व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या.
      दिव्यांग दिनानिमित्त विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने डॉ. बाळासाहेब विखे पाटील व प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथील डॉ. शोभा आव्हाड(M. S.W.), डॉ. अल्फी (सायकॅट्रिक), डॉ. जयवर्धन (सायकॅट्रिक), स्वप्निल (मेडिसिन) डॉ. सत्याराजन (बालरोग तज्ञ), डॉ. स्मितल (बालरोग तज्ञ), दिपाली वाणी, निकिता काशीद व त्यांची टीम हजर होते. आलेल्या सर्व पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अपंगांची देवता हेलन केलर व साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरोग्य शिबिरात दातांचे विकार, पोटाचे विकार, डोळ्यांचे विकार , जनरल चेकअप करण्यात आले.  
     आरोग्य तपासणी झाल्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान  भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या  प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close