shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठ्ठलवाडी येथील सिद्ध श्री गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा.

विठ्ठलवाडी येथील सिद्ध श्री गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी नजीक असणाऱ्या सिद्ध श्री गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी दिनांक २६ डिसेंबर २०१३ रोजी श्री दत्त जयंती निमित्त सकाळी अभिषेक, प्रार्थना, महायज्ञ व दुपारी १२ वाजता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम जयघोष करी श्री दत्त जयंती निमित्त फुल टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला .यानंतर उपस्थित महिला भक्तांनी श्री दत्त जन्माचा पाळणा गायला व यानंतर पूर्ण आहुती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या जन्म सोहळ्यासाठी विठ्ठलवाडी पंचक्रोशीसह, इंदापूर तालुक्यातील तसेच सोलापूर, सातारा ,अहमदनगर, फलटण ,पुणे ,करमाळा ,टेंभुर्णी इत्यादी भागातील लोक या ठिकाणी उपस्थित होते. सिद्ध श्री गोरक्षनाथ मंदिर विठ्ठलवाडी येथील भाविक भक्तामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली २४ वर्षापासून या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्याची माहिती भाविक कल्याण देवकर पाटील यांनी दिली.
close