shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगरूळे प्रशाला शालेय पोषण आहार भ्रष्टाचार प्रकरण ... गुन्हा दाखल होणार ...



 चेअरमन अनिल पट्टेद आणि विद्यमान सचिव नंदाजी कदम यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल होणार -- प्राथमिक शिक्षणाधिकारी

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अक्कलकोट : दि .30 / पंधरा लाखाच्या शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी केएलई संस्थेस आज गुन्हा दाखल करण्याची अंतिम नोटीस बजावली.


   सविस्तर माहिती अशी की , केएलई सोसायटी मंगरूळे प्रशाला, अक्कलकोट यांनी विनाअनुदानित शाळेस तीस हजार किलो अन्नधान्याचा आपल्या पदाचा गैरवापर करून शालेय पोषण आहारात गैरप्रकार केल्याचे शासकीय त्री सदस्य समितीने सिद्ध केले आहे. त्यानंतर या भ्रष्टाचाराचा प्रमुख गिरीष बसवराज पट्टेद यांनी आपल्या स्वतःचे पगार काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून मिळवले.

     आदेशात गुन्हा दाखल न करण्याबाबत कुठलेही आदेश नसून फक्त आदेशात तूर्त एकट्याचे पगार अडवू नये  असे आदेशात म्हटले आहे.वास्तविक पाहता हे प्रकरण दंडाची रक्कम भरल्याशिवाय थांबणार नाही याची कल्पना असतानाही पट्टेड यांनी संस्थेला चुकीची माहिती दिली त्यामुळे आता संस्थेला फार मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.संबंधित घोटाळ्यात विनाकारण चेअरमन अनिल पट्टेद आणि विद्यमान सचिव नंदाजी कदम यांच्या विरूद्ध लवकरच अजामीन पात्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

      या भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार गिरीष बसवराज पट्टेद हा शासनाचे दोन प्रकरणात तिस लाखाची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले असताना संस्था अद्याप त्याच्यावर कारवाई न केल्याने संस्थेला भविष्यात अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.त्यामुळे संस्था सर्वच स्तरातून बदनाम होणार आहे.संस्था तातडीने पट्टेद याला निलंबित केल्यास हे प्रकरण संपुष्टात येईल अशी खात्री तक्रारदाराने दिली आहे .
close