प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तहसील कार्यालयात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे अव्वल कारखुन अजिमोद्दीन सय्यद 31/10/2023 रोज मंगळवारी सेवानिवृत्त झाले.त्यांचा आज 29 /12/ 2023 रोज शुक्रवारी केज तहसील कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला.त्यांनी केज तहसील कार्यालयात आपल्या प्रेमळ स्वभावाने व जनतेचे तत्परतेने शासकीय कामे करुन केज तालुक्यात वेगळा ठसा उमटवला होता.
सय्यद साहेब या नावाने ते तहसील कार्यालयात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल केजचे तहसीलदार हजारे साहेब, नायब तहसीलदार धस साहेब,गोकुळ नन्नवरे, पवार साहेब, रमेश ठोंबरे, इमरान शेख व अनेक सहकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच सय्यद साहेब यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच केज पञकार बांधवातर्फे प्रकाश मुंडे,गौतमबापू बचुटे,विजय आरकडे ,संपादक अजय भांगे,दशरथ चौरे यांनी देखील सत्कार करुन पुढील अविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.पंकज तेलंग व नागेश जावळे देखील या वेळी उपस्थित होते.सय्यद अजिमोद्दीन यांना शकील सय्यद व अखिल सय्यद हे मुले आहेत.
सय्यद शकिल यांचा मोठा मिञ परिवार असून त्यांनी पण सय्यद अजिमोद्दीन यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल हृदय सत्कार केला. यावेळी सय्यद अजिमोद्दीन यांनी सर्वांचे आभार मानले.

