shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रविंद्र बेर्डे - चतुरस्त्र अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अभिनेता ! - विश्वनाथ पंडित*

        आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने कलाक्षेत्राची हानी तर झालीच शिवाय कलारसीकही एका चांगल्या, उत्तम कलावंताला, चांगल्या माणसाला मुकलेत. आकाशवाणीशी जोडल्या गेल्यानंतर तिथूनच त्यांचं अभिनयाशी नात जुळलं गेलं आणि बघता बघता ३०० हून अधिक चित्रपटातून, अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भूमिकांचे विविध कंगोरे पेश करीत लोकांच्या हृदयात कायमस्वरूपी जागा मिळवली. सहज सुंदर अभिनय, खणखणीत आवाज, स्वीकारलेल्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याची जबरदस्त ताकद, भूमिकेला स्वतःमध्ये भिनवायची जबरदस्त शक्ती मग ती विनोदी असो वा खलनायकी तेवढ्यात ताकतीने यशस्वीपणे पूर्णत्वास नेत यातूनच त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. सूक्ष्म निरीक्षण,भूमिकेचा पुरेपूर चौरंगी अभ्यास, मेहनतीतून अभिनेता म्हणून त्यांनी फारमोठी उंची गाठली होती. 

अभिनयातील ते नेताच होते. विविध विनोदी भूमिका यशस्वीपणे साकारत असतांना खलनायकही तेवढ्याच ताकदीने उभा करीत ही सुद्धा त्यांची एक खासियत होती. हमाल दे धमाल, चंगू मंगू , धडाकेबाजसह बहुसंख्य चित्रपट नाटकातून त्यांनी अभिनयाचा जो ठसा उमटवलाय तो रसिकमन कधीही विसरू शकणार नाही. रवींद्र बेर्डे या महान कलावंताला भावपूर्ण आदरांजली.

विश्वनाथ पंडित - चिपळूण
- ९५८८४५०४४२
close