shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न.

गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतंडी येथे दिं 20/12/2023 रोजी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले . या प्रदर्शनाचे उद्घाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री विजय टिळकेकर यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे ए. पी आय श्री. विक्रम साळुंखे साहेब, संस्थेचे अध्यक्ष श्री. दिनकर नाना नलवडे, गावचे पोलिस पाटील श्री.व सौ.राजश्री हरिभाऊ खाडे पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . धनाजी मोरे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाटील, निर्भया पथक बारामती विभागाच्या महिला पोलीस ज्योती जाधव, मोहिणी ढमे मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते .
विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या शोधक वृत्तीला चालना मिळावी, उत्तम नियोजन करण्याची क्षमता विकसित व्हावी, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व उपयोगी वस्तू बनविणे आणि कलागुणांना वाव मिळावा म्हणून विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रदर्शनात 250 प्रकल्प सादर केलेले होते .त्याचबरोबर कला कार्यानुभव विषयार्तंगत विविध चित्रे, प्रतिकृती, रांगोळी स्पर्धाचे ही आयोजन करण्यात आले होते . कार्यानुभव विषयार्तंगत विविध पदार्थ तयार करून खाऊ गल्लीच्या माध्यमातून सर्वांनी तयार केलेल्या पदार्थाचा आस्वाद घेतला . यावेळी गोतंडी पंचक्रोशितील सर्व जि.प.प्राथ.शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, विद्यार्थी पालक, ग्रामस्थ यांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना बक्षीसेही दिली. या प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान विषय शिक्षक श्री. महामुनीसर, श्री चव्हाणसर, श्री नलवडेसर, श्री मानेसर तसेच कला, कार्यानुभव विषयाचे प्रदर्शन श्री घोडेकेसर आणि श्रीमती हगारे मॅडम यांनी यशस्वी केले . यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले या प्रदर्शनातील सर्व विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्याचा गौरव सन्मान करण्यात आला .
close