श्रीरामपूर प्रतिनिधी:
आपला निसर्ग हा खूप श्रीमंत आहे,या निसर्गनिर्मित वनस्पतींचा शोध घेऊन ग्रामीण युवकांनी अवतीभवती असलेल्या गवत, कोरफड,जांभूळ बिया, बाभळीच्या शेंगा,काँग्रेस गवताचे बुडखे, काटेरी सराटे इत्यादी गोळा करा त्यातून खूप पैसा मिळतो. त्यासाठी फक्त मनाची तयारी हवी, न लाजता ह्या वनस्पती गोळा करून श्रीमंत व्हा, निसर्गासोबत मेहनत हवी असे विचार भोकर येथील रेणुका हर्बलचे उद्योजक मच्छिन्द्र पटारे यांनी केले.
श्रीरामपूर - नेवासा रोडवर शुद्ध शाकाहारी रेणुका हॉटेल सुरु केल्याबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मालक मछिंद्र पटारे यांचा सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ,कृषी उद्योजक पोपटराव काळे यांनी मछिंद्र पटारे यांच्या एम. आय.डी. सी.निसर्गनिर्मित वनस्पती उद्योग यासोबतच आता शुद्ध शाकाहारी हॉटेल व्यवसाय सुरु करुन एका सुसंस्कृत विचारांची संस्कृती जपत आजच्या काळात आदर्श निर्माण केला हे भूषणावह असल्याचे सांगून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उद्योजक पटारे यांचा आदर्श ग्रामीण युवकांनी जपावा असे आवाहन केले. प्राचार्य टी. ई. शेळके म्हणाले, बोरावके महाविद्यालयातील एक आदर्श माजी विद्यार्थी म्हणून पटारे हे रयत शिक्षण संस्थेचे भूषण आहेत. एका गरीब शेतकरी परिवारात जन्म घेऊन खूपच प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले,अवतीभवती असलेल्या वनस्पती ओढे, नाले, बांधाबांधावर ते फिरले आणि वनस्पती गोळा केल्या, विक्री केली आज ते श्रीमंत झाले,त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि आपले जीवन समृद्ध करा असे प्राचार्य शेळके यांनी आवाहन केले. प्रा. यावेळी शिवाजीराव बारगळ यांनी श्री .पटारे यांनी शुद्ध शाकाहारी हॉटेल व्यवसाय सुरु केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पोपटराव काळे यांनी आपले अनुभव सांगितले. मछिंद्र पटारे यांनी आपली गरिबी आणि न लाजता रानावनात फिरत कसे कष्ट केले. ग्रामीण युवक, विद्यार्थी यांनी मला भेटून चर्चा केल्यास त्यांना सर्व सहकार्य करू असेही पटारे यांनी सांगितले. आदर्श गुरुवर्यांच्या हस्ते झालेला असा सत्कार प्रेरणादायी आणि आशीर्वादासारखा असल्याचे सांगून मछिंद्र पटारे यांनी आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

