शिरसगाव प्रतिनिधी:
मुलीच्या विवाहसोहळ्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला १५००००/- रु.व दिव्यांग तरुणासाठी रोजगार निर्मिती साठी छोटेसे उद्योगमशीन काळे पा. आणि काटे पा. परिवाराकडून दिले गेले, सदर देणागी व भेट वस्तू रघुनाथदादा पाटील अध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मा.मंत्री अनिल पाटील, माजी आ. भानुदास मुरुकुटे, बिपीनदादा कोल्हे,राजश्रीताई ससाणे,अनुराधाताई आदिक या मान्यवरांच्या उपस्थितीत देणेत आल्या.
ज्येष्ठ विधिज्ञॲड.अजीत काळे यांची कन्या साक्षी व डॉ. डी.एस. काटे यांचे चिरंजीव गणेश काटे यांचा विवाह सोहळा १७ डिसेबर रोजी सायंकाळी संभाजीनगर येथे पार पडला. यावेळी ॲड.अजित काळे यांनी शेतक-यां प्रति एक सामाजिक बांधिलकी म्हणून आत्महत्याग्रस्त शेतक-याची मुलं सांभाळणाऱ्या दोन संस्थाना १०००००/- रुपये (एक लाख) व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ५१०००/- रुपये (एक्कावन हजार ) असे १,५१०००/- रु. एक लाख एक्कावन्न हजार जमा केले आहे.
तसेच डॉ. काटे यांनी भोकरदन तालुक्यातील करजगावचे रहिवासी चौरंगीनाथ लोखंडे यांना दोन्ही हात नाही या गोष्टीची जाणीव ठेवून श्री.काटे यांनी दिव्यांग तरुण चौरंगीनाथ लोखंडे या दिव्यांगाला रोजगार मिळावा यासाठी पत्रावळी बनवण्याचे एक मशीन भेट दिले.यातून चौरंगीनाथ याला स्वयंरोजगार निर्माण होणार असून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतो. आपण जीवन जगत असताना स्वत:साठी सर्व काही करतो परंतु आपण इतर गरजु लोकांना मदत केली पाहिजे या उद्देशाने या दोन्ही परिवाराने समाजा समोर एक काहीतरी वेगळे करून एक नवीन पायंडा पाडला.स्वर्गीय बबनराव काळे (शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष) यांचे चिरंजीव ऍड अजित काळे असून एक शेतकरी समाजाचा सामाजिक वारसा पुढे चालवण्याचे दायित्व जपले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

