अहमदनगर जि.मा.का.वृत्तसंस्था:
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर यांच्यावतीने महाराष्ट्र स्टुडेन्ट इनोवेशन चॅलेंज जिल्हास्तरीय सादरीकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहमदनगर येथे उत्साहात संपन्न झाले.
यावेळी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अतुल दबंगे, शासकीय तंत्र निकेतनचे अधीक्षक डॉ. दादासाहेब करंजुले, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. आर. खर्डे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र निशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय सत्रासाठी एकूण १४ परीक्षक व १४ परीक्षार्थीची निवड झाली होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले. सुत्रसंचालन मच्छिंद्र उकिर्डे यांनी तर आभार प्रदर्शन रविकुमार पंतम यांनी केले.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

