shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत गाडगे महाराज मंदिरात पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न....!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर येथील कांदा मार्केट परिसरातील श्री संत गाडगे महाराज मंदिरामध्ये ६७ वी  पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चिंतामनी काळे परीवाराकडुन जलाभिषेक तसेच  मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले प्रसंगी ह भ प कृष्णानंद महाराज यांनी श्री संत गाडगे महाराज यांच्या जिवनाविषयी माहिती देत श्री संत गाडगे बाबा कुण्या एकट्या समाजाचे नव्हते त्यांनी साक्षरता .स्वच्छता. पशुहत्याबंदी  समाज जनजागृती आदी मोहीम राबवीली आहे असे प्रतिपादन केले. प्रसंगी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे,प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये ज्येष्ठ नागरीक संघटना लक्ष्मणराव निकम सर, दशरथ भोंगळे सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री क्षेत्र डोंगरगण येथील आश्रमाचे 
ह भ प भागवत महाराज जंगले शास्त्री यांना सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच कु. अदिती संजय वाघमारे या विद्यार्थीनीस क्रिडा क्षेत्रातील  तसेच सुभाष वाघुंडे यांना अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.


प्रसंगी ॲड. विजयराव खाजेकर सिताराम निकम, सागर फंड ॲड. युवराज फंड, पत्रकार राजेन्द्र नारायणे,सुखदेव सुकळे, लेवीन भोसले, दत्तात्रय काशीद,श्री. गवळी श्री.कोल्हे, भिमराज बागुल, दिपक दळवी,योगेश राऊत, पोपट नलावडे, देविदास आभाळे, संजय वाघमारे, सुनिल जोर्वेकर, चिंतामणी काळे, पुंडलिक खैरनार, राजेन्द्र गायकवाड, संजय भागवत, गोरक्षनाथ त्रिभुवन,चंद्रकांत  अभंग, रामचंद्र निकम, एकनाथ गायकवाड,सुरेश काळे, बंडु काळे, अमोल आदमने तसेच आदमने परीवार, जनार्दन काटकर श्री. वाघ नाना, श्री. रोकडे,शिवनाथ नारायणे,रघुनाथ राऊत, भाऊसाहेब राऊत,अनिल बोरुडे, रविन्द्र राऊत, सुनिल राऊत,श्रीकांत राऊत, गणेश तुळसे,अनिल भागवत, प्रविण निकम,आकाश नलावडे, बाबासाहेब पवार, मुस्ताक शेख, संतोष तुळसे,मनोहर तुळसे आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन ॲड. युवराज फंड, सागर फंड परीवाराकडुन करण्यात आले. सुत्रंसचालन दिनेश तरटे यांनी केले तर कार्यक्रमांचे संयोजन  पत्रकार राजेन्द्र देसाई यांनी आभार मानले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close