shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे एम.जे. एज्युकेशनल फाउंडेशन बाल विकास केंद्रचा दुसरा वर्धापन दिन संपन्न.

इंदापूर येथे एम.जे. एज्युकेशनल फाउंडेशन बाल विकास केंद्रचा दुसरा वर्धापन दिन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शिवाजीनगर येथे एम. जे. एज्युकेशनल फाउंडेशनचे  बालविकास केंद्र कार्यरत असून या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन संपूर्ण झाला यावेळी गोविंद वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दशरथ महाडिक,  माजी उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे,  रमेश शिंदे,तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात,किरण गोपने आपले मत व्यक्त केले.

तसेच यावेळी प्रमोद भंडारी यांनी गीत गायले तर संमोहन तज्ञ जादूगार सूर्यकांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांचा कार्यक्रम करत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी बिभीशन देशमुख,
ज्येष्ठ नागरिक नंदकुमार गुजर, धरमचंद लोढा,  लीलन्स क्लबच्या जयश्री खबाले, सायरा आतार , , रेशमी शेख, निर्मला जाधव, निलुफर पठाण, वायसे सर, कुंभार सर, मदने सर , सोनू भाऊ जानकर, उमेश राऊत, आनंद मखरे,  शुभम मखरे, बाळासो क्षीरसागर,  सौ आरती जाधव,प्रवीण चव्हाण, ज्ञानदेव डोंगरे यांच्या  उपस्थिती मध्ये संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जाधव म्हणाले की,गेल्या २ वर्षापासून एम. जे. एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था शिवाजीनगर, इंदापूर, जि. पुणे येथे बालविकास केंद्राद्वारे निराधार, भटक्या व गरीब मुला-मुलींना मोफत शिक्षण व त्यांचा सांभाळ करत आहे. या संस्थेमध्ये २० विद्यार्थी संख्या आहे. या दोन वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावून ही संस्था अशा निराधार विद्यार्थ्यांसाठी तटस्थपणे कार्य करत आलेली आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातुन निराधार महिलांसाठी आधारमंच महिला विकास समितीद्वारे त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असून  येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक निराधारांसाठी त्यांचे जीवनमान सुखमय करण्यासाठी  संस्था सदैव तत्पर राहील. तसेच निराधारणांना निराधार न ठेवता त्यांना मी आधार म्हणून काम करणार असे मत 
सोमवार दि. ११ डिंसेंबर २०२३ रोजी  संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने निराधार मुलांच्या आनंदासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष  मनेश  जाधव यांनी आपले मत व्यक्त केले.

  या कार्यक्रमासाठी सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत   अशा निराधार मुलांना आशिर्वाद देत प्रोत्साहन देण्याचे काम केले.

या कार्यक्रमा प्रसंगी धनंजय देशमुख, धरमचंद लोढा, एल जी बनसोडे विद्यालय पळसदेव, नंदकुमार गुजर, गफुरभाई सय्यद व इतर मान्यवरांनी वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य केले.
close