मोर्शी :-
उपजिल्हा रुग्णालय मोर्शी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत 19 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली.
शिबिरातील सामाजिक कार्यकर्ता व सेवानिवृत्त कर्मचारी अशोक देशमुख यांची देखील शस्त्रक्रिया झाली, 19 शस्त्रक्रिया झाल्या असून शिबिरातील सर्व रुग्णांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार यांचा सत्कार घेतला, रुग्णांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर प्रमोद पोतदार सर आल्यापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया पार पडत आहे, तसेच चांगले प्रकारचे सुविधा दाखवण्यात मिळत आहे असे मत रुग्णांनी व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त न्याय तहसीलदार विठ्ठल वंजारी साहेब, सेवानिवृत्त परिवहन विभागातील सुरेशराव केंडे, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय वाडेकर, अधी परिचारिका रूथ लोखंडे, मीनाक्षी वगारे, जयश्री मोरे आरोग्य कर्मचारी विनय भाऊ शेलुरे, आशिष पाटील, अमोल झाडे, प्रवीण काकडे, सुचित वानखेडे, आरोग्य मित्र प्रकाश पांडे, सुजाता पांडे, वसीम शेख, बुरंगे ताई, राहुल बुरकुटे तसेच सर्व कर्मचारी व अधिकारी सत्कार समारंभ उपस्थित होते.

