भरतशेठ शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांचा वाढदिवस अहमदरजा सोशल फौंडेशन व मित्र परिवाराचे वतीने इंदापूर नगरपरिषदेसमोर उत्साहात संपन्न झाला.
भरतशेठ शहा त्यांच्यात असलेल्या सामाजिक जाणीव व दानशूरपणामुळे तरुणांच्या तसेच सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अनेक धार्मिक, सामाजिक उपक्रमांना तसेच वैयक्तिक अडचणींना सढळ हाताने मदत केल्याने भरतशेठ शहा यांचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नगरपरिषदेसमोर भरतशेठ शहा यांचा अहमदरजा सोशल फौंडेशन ने साजरा केलेल्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे दिसून आले.
यावेळी अॅड. किरण लोंढे, प्रशांतमामा उंबरे, शेखर चव्हाण, सुरज धाईंजे, मयुर ढावरे, आजम पठाण, रियाज बागवान, सोनु सय्यद, लक्ष्मण वाघमोडे पाटील, गणेश पवार, तौसिफ बागवान, नागेश भोसले, मंगेश वाघमोडे, रोहित ढावरे, उमेश ढावरे, भैय्या परदेशी व मित्र परिवार उपस्थित होता अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष वसीमभाई शेख यांनी दिली.

