श्रीरामपूर हे नाव म्हटलं की गुळ साखरेची मोठी भरभराटीची नावाजलेली बाजारपेठ, मुंबईचं उपनगर शोभावं असं शहर वजा गाव, सोन्याचा धुर निघतो असंच वर्णन करावा अस वैभव, कुबेर नगरी अशीच या शहराची ख्याती आहे. पण उपहासान म्हटलं जाणारं बिनवेशिचं गाव, अजून तसं हे सणावळीतील गाव झाले नाही फार फार तर शतकाचीच याची सनावळी.
असं हे गाव ना ऐतिहासिक, ना भौगोलिकता, ना प्रासंगिकता तसे म्हणावयास दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर बेलापूर गावासाठी झालेले रेल्वेचे स्टेशन आणि ह्या स्टेशनचे परिसराचे टप्प्यातील साईबाबांची तपोभूमी, चांगदेव महाराजांची समाधी स्थान, उपासनी सती गोदावरी माता कन्या, वेद अध्ययन केंद्र,आश्रम, चक्रधर स्वामींची कर्मभूमी, महानुभवांची काशी, शीख धर्मीयांची गुरुग्रंथ साहेब पवित्र स्थान, दायमा संस्कृती, गंगागिरी महाराज वसतीस्थान, हीच काय ती पार्श्वभूमी असे या भूमित या ना त्या कारणाने वेगवेगळ्या मुलखातील वेगवेगळ्या जाती- धर्मांचे व्यवसायाने आलेले, विसावले, स्थिरावले अशांचीच ही वसाहत.
श्रीरामपूर नगरपालिकेची स्थापना ०१ सप्टेंबर १९४७ रोजी झाली. श्रीरामपूरात मेनरोडवरील सोनार गल्लीत लोकमान्य टिळक वाचनालची स्थापना २६ जनेवारी १९५६ रोजी झाली. दिनांक २८ फेब्रुवारी १९५७ ला शासनांने त्यास मान्यता दिली. वाचनालय हे पुनम हॉटेल या ठिकाणी एक मजली जुनाट अशा इमारतीच्या दोन खोल्यात हे वाचनालय चालू झाले. गावातील मंडळी तसेच पुढारी, ज्येष्ठ नागरीक वाचनालयाचा लाभ घेत होते. अशारितीने शौक्षणिक स्थिरता, प्रसार, प्रगती होत असतानाच वाचक वर्ग निर्माण होत होते. प्रगत शिक्षित समाजाची महत्वाची गरज वाचनालय आहे. ही बाब वेळीच नगरपरिषदेच्या जाणकार नेतृत्वाच्या लक्षात आली. श्रीरामपूरचे भुषण ठरावे अशी इमारत मेनरोडवर प्रशस्त इमारतीचे उद्घाटन दिनांक १० जुन १९७२ रोजी श्रीरामपूरचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे भास्कर काशिनाथ आगाशे यांनी नगरपालिकेसाठी १३ गुंठे जागा दिल्याने त्या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात आली. इमारतीचे उद्घाटन मा.नामदार श्री.शरद पवार, राज्यमंत्री यांचे हस्ते झाले. श्रीरामपूर लोकमान्य टिळक वाचनालय येथे स्थापन झाल्यापासून व्याख्यान माला आयोजित करण्यात येतात. स्व.आण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यानमाला, रामचंद्र उपाध्ये व्याख्यानमाला, वसंतराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार, बॅरिस्टर रामराव अदिक स्मृती व्याख्यानमाला, असे अनेक व्याख्यानमाला, महिला दिन वाचनालयात राबवली जातात. लोकमान्य टिळक वाचनालय हे सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक आहे.
लोकमान्य टिळक वाचनालयाचे पहिले ग्रंथपाल कै.श्री.हरिभाऊ कुलकर्णी यांनी टिळक वाचनालयाच्या व्यवस्थापनात मोलाची भर टाकली. ग्रंथालय हेच आपले आवडीचे कार्यक्षेत्र आहे असे त्यांनी ठरवून टाकले होते. वाचनालय हे केवळ मनोरंजनाचे स्थळ नव्हे तर विचार प्रबोधनाची ती शाळा असली पाहिजे. वाचनालयात येणार्यांना नवनवीन ज्ञान विज्ञानाच्या क्षितिजांकडे झेप घेण्याची प्रेरणा वाचनातून मिळाली पाहिजे. असे त्यांचे विचार होते. केवळ भव्य इमारत आणि भरपूर पुस्तक संग्रह म्हणजे आदर्श ग्रंथालय नव्हे. हरिभाऊंना त्यांचे वाचनालय हे गावातील एक सांस्कृतिक केंद्र बनवायचे होते ते गावातील सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी उपयुक्त हवे हा त्यांचा आग्रह होता. योग्य ते पुस्तक लवकरात लवकर मिळण्याबाबत तत्परता आणि पुस्तके व्यवस्थित वापरल्याबद्दल वेळेवर परत करण्याबद्दलची ग्रंथपाल या त्यांच्या भूमिकेबद्दल तत्पर आसायचे. लोकमान्य टिळक वाचनालयाला ६८ वर्षांची ग्रंथालय परंपरा आहे. वाचनालयामध्ये हरीभाऊ कुलकर्णी अभ्यसिका नामकरण सोहळा १३ एप्रिल १९९० रोजी झाला. तसेच सध्याच्या डिजीटल युगात ई-बुक्स् लायब्ररीचे उद्घाटन ०७ मे २०१३ रोजी मा.डॉ.श्री.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते शुभारंभ झाला. वाचनालयामध्ये मुक्तद्वार, देवाण - घेवाण विभाग, अभ्यासिका विभाग, महिला बालकल्याण विभाग, बाल विभाग, ई - बुक्स् विभाग, संदर्भ ग्रंथ विभाग, ग्रंथालय विभाग, असे विभाग वाचनालय मध्ये आहे. वाचकांसाठी दिवाळी अंकांचा फराळ व मेजवाणी वाचकांसाठी व श्रीरामपूरच्या नागरीकांसाठी २०० हून अधिक दिवाळी अंक वाचनालयामार्फत खरेदी केले जातात. दिवाळी अंकांचे प्रदर्शन दर वर्षी अगाशे हॉल मध्ये लावले जाते. वाचनालयामध्ये सभासद संख्या एकुण ९२५ आहे. आजपर्यंत ग्रंथ संख्या ७० हजार. दैनिके २७, साप्ताहीके ११, पाक्षिके १९, मासिके २०, दिवाळी अंक २०० हुन आधिक येतात. ग्रंथलायामार्फत विविध उपक्रमे राबविले जातात. ८ मार्च महिला दिन, १५ ऑक्टोबर रोजी ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन, ग्रंथप्रदर्शन, संस्कृतीक कार्यक्रम, वाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, जिज्ञासात्मक प्रश्नउत्तर स्पर्धा, बुध्दीबळ स्पर्धा, काव्यवाचन, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, व्याख्यानमाला असे उपक्रम राबविले जातात. ग्रंथालयात कथा, कादंबरी, ललित साहित्य, प्रवास वर्णन, नाटक, काव्य, एैतिहासीक, सामाजीक, शौक्षिणक, धार्मिक पुस्तकांचा खजिना आहे. वाचनालयामध्ये स्वातंत्र्य आभ्यासिका एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. विभाग आहे. स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी ४०० हुन जास्त रोज अभ्यास करतात. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. वाचनालयातील अभ्यसिकेतील विद्यार्थी - विद्यार्थींनी सेल्फ स्टडी करून विविध उच्चपदावर कार्यरत आहे. महिला बाल कल्याण विभाग स्वतंत्र आहे. बालविभाग स्वतंत्र आहे. वाचनालयात येणार्या बालकांसाठी बाल साहित्य उपलब्ध करून देण्यात येते. चांदोबा, ठकठक, हरिपॉटर, श्यामची आई, सानेगुरूजी असे अनेक बाल साहित्य वाचकांसाठी देण्यात येते. सदंर्भ ग्रंथांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. अगदी दुर्मिळ ग्रंथ येथे पहावयास मिळतात. मराठी विश्वकोश, सांस्कृतीक शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, आयुर्वेदि महाकोश, राज्यशास्त्र कोश, विज्ञानकोश, इनसायक्लोपेडिया ब्रिटानिका खंड २० आहे. इतर संदर्भ ग्रंथ पहावयास मिळतात.
सार्थ श्री.एकनाथी भागवत, दासबोध, भगवतगिता, गुरुचरित्र, संत तुकारामांची गाथा, सार्थ ज्ञानेश्वरी, जैमिनी अश्वमेध, नवनाथ भक्तीसार, पांडव प्रताप हे धार्मिक ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहे. तसेच कथा कादंबर्या, मृत्युजंय, संभाजी, छावा, आमृतवेल, ययाती, महानायक, युगंधर, अग्नीपंख, सानेगुरूजी, श्यामची आई असे ग्रंथ वाचनालयामध्ये वाचनीय साहित्य उपलब्ध आहे. ग्रंथालयाचे सभासद वर्गणीदार यांची वर्गवारी केली आहे. पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, पहिल्या वर्गामध्ये १ पुस्तक, १ मासिक वर्गणी २०/- रू. महिना, वर्षाची वर्गणी २४०/-रू. अकारली जाते. दुसरा वर्गामध्ये १ पुस्तक १५ /- रू.महिना, वर्षाची वर्गणी १८०/-रू. अकारली जाते. तिसऱ्या वर्गामध्ये १ मसिक १०/- रू.महिना वर्षाची वर्गणी १२० /- रू.अकारली जाते. वचनालयामध्ये जुनी पुस्तके जतन करण्यात आलेली आहे. लोखंडी रॅकमध्ये दाखल अंकनुसार पुस्तक ठेवलेली आहे. ग्रंथ शेधण्यासाठी तालिका/सुची तयार करण्यात आली आहे. ग्रंथनाम, लेखक, विषय अश्या पद्धतीने सुची केली आहे. वचनालयातील पुस्तकांची साफसफाई, किटकनाशक फवारणी केली जाते. खराब झालेले कार्ड बदलण्यात येतात. पुस्तकांचे स्टॉक व्हेरिपिकेशन दर वर्षाले केले जाते. वचनालयात येणारे स्पर्धा परिक्षा आभ्यसासाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी हे जवळपासच्या ग्रामिण भागमधुन अभ्यासासाठी येत असतात. घरची परिस्थती नाजुक असल्याने स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांच्या किंमती जास्त असल्याने ते खरेदी करू शकत नाही.अश्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वाचनालयातून पुस्तके दिली जातात. वाचनालयामध्ये स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांसाठी वेगळा कक्ष आहे. नौकरी संदर्भ, एम्प्लॉयमेंट न्युज, इकोनॉमिक टाईम्स, अॅग्रोवन असे वेगवेगळे साहित्य वाचकांच्या सुचनेनुसार उपलब्ध करून दिले जातात. वाचनालयात आलेल्या दैनिकांचे फॉईलिंग केली जाते. वाचकांना एकाच बंच मध्ये १ महिन्याचे दैनिके पहावयास मिळते. अश्या सर्व २७ दैनिकांची रोजच्या रोज फाईलिंग केली जाते.
श्रीरामपूर नगरपरिषद लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथ संग्रहालय यांस महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार २००४ - २००५ हा पुरस्कार शहरी उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय म्हणून पुरस्कार मिळाला.
लेख - *स्वाती पुरे (ग्रंथपाल)*
लोकमान्य टिळक वाचनालय, श्रीरामपूर
श्रीरामपूर नगरपरिषद लोकमान्य टिळक वाचनालयत ग्रंथपाल स्वाती पुरे पुस्तक वाचन करताना
*लेख विशेष सहयोग*
रज्जाकभाई पठाण,श्रीरामपूर
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

