अचानक रेल्वेगाड्या रद्द केल्याने संताप
शिरसगाव प्रतिनिधी:
कर्मचारी निवृत्ती वेतन योजना ९५ [EPS95] अंतर्गत, ७५ लाख निवृत्तीवेतनधारक म्हणजे खाजगी क्षेत्रातील ,सरकारचे उपक्रम,सहकारी क्षेत्र,परिवहन महामंडळ, विद्युत मंडळ,विडी उद्योग , वस्त्र उद्योग, विश्वस्त संस्था, औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणि माध्यम क्षेत्रे ज्यांचे पेन्शनसाठी दरमहा रु.४१७/-, रु. ५४१/-, रु.१२५०/- त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी योगदान म्हणून जमा केले जाते, त्यांना कोणत्याही महागाई भत्त्याशिवाय दरमहा सरासरी केवळ रु. ११७० /- पेन्शन मिळते.यातील ४० टक्के लोकांना दरमहा एक हजाराहून कमी पेन्शन मिळत आहे.एवढ्या कमी पैशात वयोवृद्ध जोडप्याला सन्मानाची जीवन जगणे पूर्णपणे अशक्य आहे.
किमान पेन्शनमध्ये रु. १०००/- वरून रु. ७५००/- पर्यंत वाढ + DA, सर्व पेन्शनधारकांना कोणताही भेदभाव न करता उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा, मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा आणि नॉन-ईपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचार्यांना दरमहा रु. ५०००/- पेन्शन इत्यादी मागणी EPS95 पेन्शनधारक सातत्याने करीत आहेत. सर्व प्रकारची आंदोलने करुन/निर्णय प्रक्रियेतील सर्वांच्या भेटी गाठी घेऊन /निवेदने देऊन सुध्दा केंद्र सरकार लक्ष देत नाही.
वरील मागण्या मान्य होण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 7 वर्षे संघर्ष करत आहे. संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा येथे ५ वर्षापासून साखळी उपोषण सुरु आहे.अत्यंत कमी पेन्शन आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे दररोज २०० ते ३०० EPS95 पेन्शनधारक हे जग सोडून जात आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे वरील मागण्या मान्य होण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी दिनांक ७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर देशव्यापी निषेध व संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यावर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर दिल्ली येथे जंतरमंतर वर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी दिला आहे.
या मुद्द्यावर EPS95 राष्ट्रीय संघर्ष समिती. सर्व EPS 95 सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक ,- श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, उपाध्यक्ष एस. के. सय्यद , शहराध्यक्ष संजय मुनोत , उपाध्यक्ष प्रकाश गायके, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशाताई शिंदे, नगर तालुकाध्यक्ष बेरड, उपाध्यक्ष भिसे,श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत अप्पा वाळके, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, शिर्डी अध्यक्ष दशरथ पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, एस.के.सय्यद इत्यादि नेत्यांनी सभेला संबोधित केले. पेन्शनधारकांनी ०७/१२/२०२३ च्या दिल्ली आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. त्याप्रमाणे दि. ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यातील हजारो पेन्शन धारक दिल्ली येथे विविध रेल्वेने जाणार आहेत. हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून तांत्रिक कारणामुळे शिर्डी - दिल्ली कालका रेल्वे रद्द केली. अमृतसर आदी रेल्वेला आरक्षण होऊ शकत नाही. असे रेल्वेने सांगितले. त्यामुळे शेकडो पेन्शन धारकांनी आपली तिकिटे रद्द केली व दुसऱ्या रेल्वेची वेटिंग तिकिटे काढावयांस भाग पाडले. अचानक ५ डिसेंबर च्यापुढील गाड्या रद्द झाल्या. त्यामुळे असंतोष पसरला आहे. एक प्रकारे केंद्र सरकार वयोवृद्धांवर अन्याय करीत आहे असे दिसते अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक बी.आर. चेडे यांनी दिली. नियोजनाप्रमाणे मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

