shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खेळामुळे मानसिक व शारिरीक आरोग्य लाभतेः माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
खेळामुळे मन निरोगी व निकोप राहते तर शरीराला व्यायाम मिळून शारीरिक आरोग्य लाभते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सह.सा.कारखाना संचलित अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर काॕलेजच्या वतीने स्कूलच्या तथा कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उदघाटनप्रसंगी माजी आ.मुरकुटे बोलत होते.
              श्री.मुरकुटे म्हणाले की, शालेय जीवनात खेळाचा आनंद मिळतो. विद्यार्थी दशेतच शारिरीक व मानसिक तंदुरुस्ती मिळविता येते. खेळामुळेच मी वयाच्या ऐंशीव्यावर्षीही मैदानावर असून तंदुरुस्त आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाइतकेच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

              याप्रसंगी कारखाना संचालक रामभाऊ कसार, भारत राष्ट्र समितीचे गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, वसंत लबडे,  माजी गट विकास अधिकारी शाम पुरनाळे, मॉर्निंग ग्रुपचे उत्तमराव डांगे, दादासाहेब औताडे, उध्दव आहेर, अनिल फोपसे, अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य संपत देसाई यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close