shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वसई विरार चे माजी महापौर रुपेश जाधव यांना ईडी ची नोटीस ; रूपेश जाधव यांनी केला खुलासा

                      रूपेश जाधव

प्रतिनिधी : अजय वर्मा

वसई विरार : २ /  सध्या वसई विरार मध्ये माजी महापौर रुपेश जाधव यांना आलेली ईडी ची नोटीस हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडियावर वायरल झालेल्या या नोटीस मध्ये रूपेश जाधव व त्यांच्या व्यावसायिक भागीदारांची नावे असून तब्बल ७८० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकऱणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

 तसेच चौकशीसाठी नवी दिल्ली येथील ईडी कार्यालयात १५ दिवसात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे देखील या नोटीस मध्ये म्हटले आहे.

मात्र , ही नोटीस बनवाट असून मला किंवा माझ्या कंपनीला अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचा दावा रुपेश जाधव यांनी केला आहे.

या प्रकरणी बदनामी केल्याबद्दल व ईडी ची बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल  पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.
close