अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने मांतग समाज व तत्सम जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व रोजगार व स्वयंरोजगार साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या तसेच महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा प्रचार व प्रसार तळागाळातील जनतेपर्यंत पोहण्याच्या दृष्टीने ४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२ - ०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवन सावेडी, अहमदनगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मातंग तथा तत्सम जातीच्या समाज बांधवानी बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रणिता रा. बोराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111

