श्रीरामपूर प्रतिनिधी:
प्रत्येकाच्या सुख दुखात, अडीअडचणीत संकटांना धावून जाणारा लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करून प्रत्येकाच्या मनामनात आपलं स्थान निर्माण करणारा राजकारणातील जनसामान्यांचा खरा नेता म्हणजे सुभाष दादा त्रिभुवन होय असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांनी त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात काढले.
लोक कला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने सुभाष दादा त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन, नूतन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच सत्कार समारंभ या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याप्रसंगी अनेकांनी सुभाषदादा त्रिभुवन यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, नगरसेवक मुक्तारभाई शाह, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, रमाताई धीवर, प्राचार्य सुनिताताई गायकवाड ,प्राचार्य शेळके सर यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी रिपाईचे विभागीय अध्यक्ष भिमराज बागुल, भिम शक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे ,रिपाईचे तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट, शहराध्यक्ष विजय पवार, जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, मोहन आव्हाड, सोनू राठोड, लहुजी सेनेचे बाळासाहेब बागुल, हनिफभाई पठाण, समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,ॲड.मोहसिन शौकत शेख, शुभम लोळगे, अर्जुन शेजवळ, प्रसाद सातुरे, महिला आघाडीच्या विजयाताई बारसे, वंदना गायकवाड, कल्पना तेलोरे, जयश्री पवार असे अनेक मान्यवर तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कवी संमेलनात यशवंत पूलाटे ,सुरेश वैरागर ,राजेंद्र थोरात, भास्कर लगड,निवृत्ती महाराज कानवडे, एकनाथ डांगे ,महेश कुलकर्णी, अण्णासाहेब मोहन, रज्जाक शेख डॉ. संजय दुशिंग, कवी बाबासाहेब पवार आदीं कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण पडवळ, गणेश साळवे अर्जुन शेजवळ, निलेश कोळगे, संदीप धीवर, भाऊसाहेब बनसोडे, संघराज त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बाबासाहेब पवार यांनी केले.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

