सरकारने दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान जाहीर करताच..... दूध दरासाठी उपोषण करणाऱ्या दिपक काटे व माऊली वणवे यांना दुधाने करण्यात आला अभिषेक.
इंदापूर प्रतिनिधी: राज्य सरकारने दुधाला प्रती लिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले.शासनाच्या या निर्णयाचा इंदापूर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी दरासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्ते दिपक काटे व माऊली वणवे यांना दुधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जगाचा पोशिंदा शेतकरी वाचला पाहिजे तसेच शेतकरी समृद्ध देखील झाला पाहिजे.हे उद्दिष्ट ठेवत दुधाला शासनाने जाहीर केलेल्या दर मिळावा यासाठी इंदापूर प्रशासकीय भवन समोर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे व माऊली वणवे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.याबाबत उपोषणाच्या ११ व्या दिवशी राज्य सरकार कडून दोन दिवसात निर्णय घेतला जाईल या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. याबाबत जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी आश्वासन दिले होते.
याची दखल घेत शासनाने दुधाला ५ रुपये अनुदान जहिर केले.या निर्णयाचे शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे, माऊली वनवे, दादा भोसले, विशाल धुमाळ, विजय डोंगरे, संदीप धनवडे पाटील, पिंटू बोडके, संतोष खरात, चंद्रकांत गोसावी, महादेव माने, हनुमंत देवकर, सोनू भैय्या क्षीरसागर आदी उपस्थित होते.
-------------------------------------
- अन्यथा पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार ...
सहकारी दूध उत्पादक दूध संघाना शासनाच्या वतीने पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हे आमच्या आमरण उपोषणाला यश आले आहे. तसा आदेश देखील शासनाने काढले आहे. मात्र केवळ सहकारी दूध संघाना ते लागू करण्यात आले आहे असे ऐकण्यात आले आहे. मात्र हा जीआर केवळ सहकारी नव्हे तर खाजगी दूध संघाना देखील हा जीआर लागू करावा अन्यथा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे.

