अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव व्हावी यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे. ग्राहकांमध्ये जागृती होण्यासाठी दरवर्षी २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, कोपरगांव येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे महत्व जाणुन घेण्यासाठी ग्राहक चळवळीशी संबंधित सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

