अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्यात लागू केलेली आहे.
अभय योजना २०२३ चा लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्त झालेली आहे, त्यांनी त्यांचा अर्ज जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बुरुडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहमदनगर येथे सादर करावा व या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी शरद झोटींग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा ०२४१-२३४३२२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

