मुस्लिम समाजाची अधोगतीवर नगरमध्ये विचार मंथन बैठक संपन्न
अहमदनगर प्रतिनिधी:
मुस्लिम समाजाला शैक्षणिक आर्थिक औद्योगिक वैद्यकीय व वक्फ सारख्या विभागांमध्ये मुसंडी घ्यावी लागेल. या क्षेत्रातील मागासलेपण दूर झाल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही असे प्रतिपादन तंन्जिमे मोमेनीनचे अध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी यांनी केले.
अकलियत सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थातर्फे तंन्जिमे मोमेनीन मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
हाजी तांबेळी पुढे म्हणाले, मुस्लिम समाजावर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी माॅबलिंचींग, लव्ह जिहाद, बुरखा, मांसाहार अशा अनेक कारणाने हल्ले अत्याचार होत आहे.पोलीस, प्रशासन व राजकीय नेत्यांकडून पण समाजाला न्याय मिळत नाही. समाजात काम करणारे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात अडकून बसले असल्याचे ते म्हणाले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तांबोळी जमाअतचे प्रदेश सचिव हाजी शौकतभाई तांबोळी हे होते. .
मुस्लिम समाजात धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात होतात. पण आपले धार्मिक मतभेदामुळे आपसातच मनभेद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आम्हाला याच्यात न पडता समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक, औद्योगिक,वैद्यकीय वक्फसाठी मोठे काम करण्याची गरज आहे. आमची पिढी व्यसनाच्या आहारी नष्ट होत आहे. अर्ध्या रात्रीपर्यंत सोशल मीडियावर लागून चौक व कट्ट्याची शोभा वाढवत आहे. त्यावर आम्हाला लक्ष केंद्रित कण्याची गरज असल्याचे हाजी शौकतभाई तांबोळी म्हणाले.
नोटरी ॲड. हाफीज एन. जहागिरदार म्हणाले, १९४७ सालापासून मुस्लिम समाजाची विविध विभागांमध्ये इतर समाजाच्या तुलनेत प्रगती ऐवजी अधोगती झाली. याला कारणीभूत असलेल्या व्यवस्थेमधून समाजाला स्वतःला मार्ग काढावा लागेल. त्यासाठी जमिनीस्तरावर, गाव पातळीपासून प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तालुकास्तरावर असे कार्यक्रम घेण्याचे ठरविले पाहिजे, शिक्षणाचा प्रमाण व दर्जा यावर पण लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक उन्नतीकरिता बिनव्याजी आर्थिक व्यवस्था निर्माण करून समाजाला प्रभोधित करावे लागेल. त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायामध्ये प्रशिक्षित करून लहान मध्यम मोठे उद्योग करण्यात प्रवृत्त करावे लागेल. जेणेकरून नोकरीच्या मागे न लागता स्वयंम रोजगार निर्माण करुन इतरांना रोजगार देण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी विविध विभागातून शासकीय योजनांचा उपभोग कसा घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागेल. यासाठी अहमदनगर येथे मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली.
डॉ. इमरान शेख म्हणाले, वैद्यकीय विभागाकडून शासनाच्या निरनिराळ्या योजनेचा सामान्य नागरिकांना कसा फायदा होईल व त्याचबरोबर सध्या समाजामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून समाजाला कमीत कमी दराने वैद्यकीय सेवा कशी देता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या ताब्यात असलेल्या वक्फ मिळकतीचा समाजासाठी कसा फायदा होईल याबाबत योग्य ती दिशा ठरवुन यासाठी कार्यालयामध्ये जाऊन अडचणी बाबत वक्फ बोर्डाकडे, शासनाकडे वक्फच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात येईल व वेळ प्रसंगी आंदोलन ही करण्यात येईल असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना सय्यद खलील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
यावेळी अब्दुस सलाम खोकर, नोटरी ॲड. हाफीज एन. जहागीरदार, आर्किटेक्ट अर्शद शेख,उद्योगपती करीम हुंडेकरी, इंजि. तौसिफ शेख, मुबीन खान, मोहम्मद रफीक शेख, अहमदभाई जहागिरदार, श्रीरामपूर, हाजी नजीर व जिल्हाभरातून वेगवेगळ्या तालुक्यातून आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. हनिफ बाबुजी, शेख शाकीर, सय्यद खलील, मोहंमद शोएब तांबोळी, आसिफ, इलियास तांबोळी, इंजि. मोहंमद अकील, इंजि. अब्दुला तांबोळी, उसामा तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर आभार निसार बागवान व आसिफ यांनी मांनले.
*पत्रकार शेख गुलामकादर जहागीरदार
*उर्फ जी.एम अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

