shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा..!


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशा दोन टप्यात लागू केलेली आहे. 

अभय योजना २०२३ चा लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्त झालेली आहे, त्यांनी त्यांचा अर्ज जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बुरुडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहमदनगर येथे सादर करावा व या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी शरद झोटींग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी  जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा ०२४१-२३४३२२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
[२१/१२, १७:५५] Shaukatbhai Shaikh: *माणसात देव पाहणारे संत म्हणजे* 
*गाडगेबाबा -विजयराव खाजेकर*

श्रीरामपूर प्रतिनिधी:
नव स्वराज्य सेनेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास नव स्वराज्य सेना  या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर, डी. एल.भोंगळे सर, मुस्ताक भाई शेख,यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्वांनी अभिवादन केले.
यावेळी श्री.खाजेकर म्हणाले की, अंधविश्वासामध्ये फसलेल्या समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून विषमतावादी व्यवस्थेला सुरूंग लावून समतावादी व विज्ञानवादी व्यवस्था प्रस्थापित करून दगडातील देवाला विरोध करून माणसांमध्ये व माणसाच्या सेवेमध्ये देव शोधणाऱ्या संतापैकी एक महत्त्वपूर्ण संत म्हणजे गाडगेबाबा होते, त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून चोरी करू नका, व्याविचार करू नका , व्यसन करू नका ,देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राणीमात्राची हत्या करू नका, खोटे बोलून व्यवहार करू नका, कर्ज काढून लग्न करू नका, मुलांना शाळेत पाठवा अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. या शब्दात विजयराव खाजेकर यांनी गाडगेबाबांचे वर्णन केले 
या कार्यक्रमासाठी. बाबासाहेब पवार , डॉ.बाबुराव उपाध्ये सर , मुस्ताक शेख, पत्रकार राजेंद्र देसाई, दशरथ भोंगळे सर , लक्ष्मणराव निकम सर ,राजेंद्र थोरात, वाघुंडे मॅडम, वाघुंडे सर , महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close