shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून रज्जाक शेख सन्मानित..!


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- स्व.लीलाताई सतीश आव्हाड फार्मसी महाविद्यालय मुखेड जिल्हा नांदेड येथील सभागृहात आयोजित पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजसेवक नारायण काळबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गझलकार रज्जाकभाई शेख यांचा मराठी भाषा संवर्धन व संरक्षण चळवळीत केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमात  संमेलनाध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे, भैरवनाथ कानडे, नारायण गायकवाड, जयश्री ताई गायकवाड, बंटी सेठ,शंकर पाटील लुटे, पार्थ गायकवाड, रविंद्र गिमोणकर,भालचंद्र नाईक, विलास सिंदगीकर, गुलाबराजा फुलमाळी, एपीआय महेश लांडगे,मा सत्येंद्र राऊत, पंकज गायकवाड,मा बोबडे, केराबाई गायकवाड, तसेच सर्व प्रमुख  पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,स्नेहवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

श्रीरामपूर येथील ग्रामीण साहित्यिक रज्जाकभाई शेख  यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितेचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत.शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या दीड हजारापेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.

आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा  कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे.आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत सत्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन ,श्रीरामपूर तसेच  औरंगाबाद येथील कविसंमेलनाचे ते माजी संमेलनाध्यक्ष आहेत.त्यांच्या सन्मानाबद्दल निवडी बद्दल  प्राचार्य सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
close