भोकर-कारेगाव, वडाळामहादेव व माणीकदेव रस्ता दुरूस्तीची युवकांची मागणी
श्रीरामपूर प्रतिनिधी:
रस्त्यांशिवाय विकास होत नाही हे सत्य असले तरी केवळ रस्ते करणे म्हणजे विकास नव्हे, आपण केवळ रस्ते बांधत राहीलो तर इतर विकास कधी करणार? आपल्या गावापासून मार्केटींग व्यवस्था सुरू करावी लागणार आहे. बदलत्या काळाबरोबर गावं बदलत आहेत, त्याबरोबर गरजा ही बदलत आहेत याचा विचार करून इतर विकासावर भर द्यावा लागणार आहे त्यातून भोकर गाव तालुक्यात आदर्श गाव म्हणून करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार लहु कानडे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील वडजाई परीसरातील युवा ग्रामपंचायत सदस्य मयुर काळे यांचे निवासस्थानी आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी भागवताचार्य संतोष महाराज पटारे, सुदाम महाराज चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचीटणीस ज्ञानेश्वर मुरकूटे, अरूण पाटील नाईक, अशोक नाना कानडे, किसान सेलचे अजिक्य उंडे, अशोकचे माजी संचालक खंडेराव पटारे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, खोकरचे आबासाहेब पवार, वळदगावचे सरपंच अशोकराव भोसले, भोकरच्या सरपंच सौ. शितल पटारे, उपसरपंच सागर आहेर, भिकाजी पोखरकर, रामदास शिंदे, मच्छींद्र पटारे, दिलीप पटारे, गणेश कांबळे व भाऊसाहेब पटारे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.
यापुर्वी केवळ शेतकर्यांच्या लढ्यामुळे केंद्र सरकारला कृषी कायदा मागे घ्यावा लागला आता पुन्हा तेच घडू पाहत आहे, हि शेतकर्यांसाठी धोक्याची घंटा आहे आहे. सध्या ग्रामीण भागात आपल्या मनाप्रमाणे विकास करण्याचे साधन म्हणून ग्रामपंचायतीकडे बघीतले जात आहे. त्या माध्यमातून हल्ली केवळ पैसे कमविण्यासाठी ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करायचा अन् त्याच पैशातून मद्य, मांस व पैसे देवून सत्ता ताब्यात घेण्याचा घाणेरडा प्रकार सुरू झालायं हा गावच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. पण आता मतदार ही बदलतोय याचा विचार करा त्याच बरोबर हा प्रकार थांबविणे कुण्या एकट्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकाने सहकार्य केले पाहीजे. प्रत्येकाने आपल्या हिताचे राजकारण करावे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची असते असे ही यावेळी आमदार कानडे यांनी सांगीतले.
यावेळी येथील युवकांनी भोकर- कारेगाव रस्ता, भोकर - वडाळामहादेव व माणीकदेव रस्ता तातडीने मजबुतीकरण व डांबरीकरणाची गरज असल्याचे सांगत या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी अनेक युवकांनी पुढे येत निवेदनाद्वारे आमदार लहु कानडे यांचेकडे रस्ता दुरूस्ती व मजबुतीकरणाची मागणी केली. यावेळी प्रास्ताविक व सुत्र संचालन काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांनी केले त्यात गावात झालेली कामे व अद्याप अपुर्ण कामे मांडली.
यावेळी प्रताप पटारे, सम्राट माळवदे, निखील कांबळे, सागर शिंदे, भाऊसाहेब पटारे, बाळासाहेब बेरड, दत्तात्रय पटारे, नामदेव चव्हाण, कचरू पटारे, पोपटराव पटारे, राहुल अभंग, नारायण पटारे, नानासाहेब तागड, राजीव तागड, लहानु विधाटे, ठकसेन खंडागळे, नामदेव वाकडे, आप्पासाहेब जाधव, मयुर काळे, दत्तात्रय काळे, आप्पासाहेब जाधव, संदिप गांधले, डॉ.सागर अभंग, वेणुनाथ डूकरे, सौ.ज्योती डूकरे, बाबुराव तागड, अशोक भद्रे, सोपान पटारे, भास्कर आहेर, सर्जेराव आहेर, राजेंद्र पटारे, बाबासाहेब मते, गोरख पवार, कारभारी शिंदे, मारूती शिंदे, राजेंद्र राहींज, याकोब अमोलीक, निवृत्ती पटारे, वैभव पटारे, आकाश सुतार, पांडूरंग गाढे, आण्णासाहेब पटारे, सखाराम वाकडे, पोपट मांजरे, अक्षय वाकडे, रावसाहेब पवार, प्रणय पटारे, नवनाथ मते आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे -भोकर
*सहयोगी,- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

