shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उठ वडार बांधवा जागा हो..., उज्वल भविष्याचा धागा हो..आज नाहीतर ..कधीच नाही....!! वडार विकास परिषद जन आंदोलन, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने १४ मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन..!!


नागपूर प्रतिनिधी
आरक्षण,अस्मितेचा,अस्तित्वाचा आणि आदर्शवादी सन्मानित भविष्यातील वडार समाजातील पिढीच्या सर्व गुण संपन्नतेच्या उद्धारासाठी एकत्र येण्याची हाक कु.संगिताताई पवार या रणरागिणीने दिली आहे.भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७६ वर्षे झाली देशाच्या प्रभावी जडणघडण मध्ये अति महत्वपूर्ण किमया करून दाखविणारा आमचा वडार समाज मुलभूत विकासाच्या सुख सुविधा पासून वंचित का राहिला? सरकार अनेक येतात आमच्या समाजाचे मेळावे घेतात “मोठ्या थापा”मारतात निघून जातात आणि वडार समाजाच्या पदरात काय तर कायमची निराशा.राजकारण्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या संघटना आणि समाजात निर्माण होणारे गट तट हे भावी पिढीला घातक ठरत आहे. यासाठी एक विचार मंथन होऊन वडार समाजाची खरी चळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे.


भारत देशातील संविधान एक असेल तर वडार समाजाला कर्नाटक,तेलंगणा,आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये एस सी,एस टी मध्ये आरक्षित करण्यात आले आहे मग महाराष्ट्रातील वडार समाज विमुक्त जाती मध्ये का?“ना घर का ना घाट का” अशी अवस्था झाली आहे.लाचारी पत्करून वडार समाज असह्य वेदनेने तळमळत आहे. याला जबाबदार कोण आहे?दगड,मातीच्या ढिगाऱ्यांत मृत्यू हातात घेऊन काबाडकष्ट करून जगणारे आमच्या वडार समाजातील कुटुंबांना न्याय कोण देणार? इतर अनेक समाजाचे नेतृत्व करणारे राज्य सरकारच्या सत्तेत आहेत म्हणून त्यांना न्याय मिळतो.आमचे कोण?आणि आमच्या मताला महत्त्व काय? अशा अनेक गोष्टींचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि वेळ हिच आहे.“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या उक्तीप्रमाणे वडार बांधवांनो आता झोपून चालणार नाही “उठ वडार बंधू जागा हो,उज्वल भविष्याचा धागा हो”दगडा प्रमाणे एक घाव दोन तुकडे केल्या शिवाय वडार म्हणून शोभून दिसणार नाही. वेळ आली आहे, वडार म्हणून सिद्ध करण्याची ! नमुद करण्यात आलेल्या सर्व व्यथा,वेदना या वडार समाजाच्या ज्वलंत प्रतिक्रिया एक वडार म्हणून प्रत्येक वडार बांधवांनी अनुभव घेतला आहे.म्हणून सकल वडार समाज एकत्र येऊन होणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन संगिता ताईंनी वडार विकास परिषद जन आंदोलनाच्या माध्यमातून नागपूर येथे आज गुरुवार दि.१३/१२/२०२३ रोजी  धरणे आंदोलन करण्यात आले.

*वडार समाज प्रमुख मागण्या..

1).1961 ची अट शिथिल करून ----परिपत्रक प्रमाणे गृह चौकशी अंमलबजावणी करुन जातीचे दाखले मिळावेत.
*2).* वडार समाजाला अनुसुचित जमाती मध्ये (ब) करून समावेश करावा.
*3).* पारंपरिक व्यवसायात सर्व प्राधिकरणामध्ये 30℅ आरक्षण मिळावा. ( सरकारी निविदा मध्ये)
*4)* महाराष्ट्रातील प्रमुख शहरात वडार साहित्य भवन, वसतिगृहे, आश्रमशाळा, शैक्षणिक योजना करिता शासकीय जमिनी मिळावेत.
*5).* प्रितीलता वड्डार महिला सन्मान योजना राबवावी. बस स्थानके, प्रमुख रस्त्यावर महिलांना व्यवसाय करिता स्टाॅल, जागा व अल्पव्याज कर्ज मिळावे.
*6).* मराठा समाज आर्थिक व सामाजिक स्थिती पाहणी सोबत वडार समाजाची पाहणी आणि जनगणना करणे.
*7).* वडार समाज आर्थिक विकास महामंडळाचे जाचक अटी शिथिल करण्यात यावे.(उदा. १० लाखापर्यंतचे कर्ज विनाजामीन मिळावे.)
*8).* वडार समाज शासकीय समिती पुनर्गठित करावी आणि त्याचे अध्यक्ष समाजातील सुशिक्षित महिला असावी.
*9).* मजूर सोसायटी पुनर्गठित करण्यासाठी परवानगी मिळावी.
*10)* भूमिहीन वडारांना शेती करण्यासाठी शासकीय गायरान जमिनी देण्यात यावे.
*11).* स्थलांतरीतासाठी  जातीचे दाखले मिळावेत व जातपडताळणीच्या अटी शिथिल करण्यात यावे.. 
*12).* पारंपरिक व्यवसायाकरिता शासकीय जागा आणि बीन व्याजी भांडवल उपलब्ध व्हावे.
*१३)* मुला- मुलींना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय वस्तीगृह मध्ये १०टक्के आरक्षण मिळावे.
*१४)* वडार समाजाच्या महिला व पुरुष बचत गटांना बीनव्याजी कर्ज मिळावे. इत्यादी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

हक्काच्या लढाईत आमंत्रणे पाठवली जात नाहीत.ज्यांची सद्सद् विवेक बुद्धी जिवंत आहे, ते स्वतःच पाठिंब्याला येतात.
close