shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदित्य नगरकर यांना पुरुष अभिनय पुरस्कार जाहीर

२१ डिसेंबर रोजी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

श्रीरामपूर प्रतिनिधी:
अहमदनगर येथे नुकत्याच ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून १६ नाट्य मंडळाने सहभाग नोंदविला होता, त्यात श्रीरामपूर येथील कर्णेज ॲकॅडमी च्या वतीने "परिघ" हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले, त्यात श्रीरामपूर येथील जाणता राजा कलाकार श्री.आदित्य विजय नगरकर याने प्रमुख भूमिका उत्कृष्टपणे सादर केली म्हणून उत्कृष्ट पुरुष अभिनय पुरस्कार त्यास जाहीर झाला आहे.

या राज्य नाट्य स्पर्धेसाठी श्री. संजय पेंडसे, श्री.सुहास देशपांडे आणि श्रीमती आसावरी शेट्ये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर उपनगर शाखेच्यावतीने पुरस्कार विजेत्या कलाकारांचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

श्री.आदित्य नगरकर यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री‌रामपुर येथील सर्व नाट्यप्रेमींनी अभिनंदन केले आहे, नगरकर यांनी या आधी देखील बरीच नाट्य अभिनय पुरस्कार मिळालेली आहेत.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close