shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हरिगांव ग्रामपंचायतला घरकुलासाठी २० एकर जमीन मिळणार - दिलीप त्रिभुवन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथील शेती महामंडळाची हरिगांव गावठाण विस्तारासाठी गावठाण जवळची गट क्र. ४८ मधील ८ हेक्टर (म्हणजे २० एकर) जमीन व उपविभाग ३ एकूण क्षेत्र ४७३.८४ हे.आर मधील क्षेत्र हरिगांव ग्रामपंचायतला घरकुलासाठी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या प्रयत्नातून मागणी केलेप्रमाणे जमीन मिळणार असून गोर - गरिबांना न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन हरिगांवचे प्रभारी सरपंच दिलीप त्रिभुवन यांनी नुकतेच केले. 

याआधीच्या महसूलमंत्री यांनी प्रस्ताव सादर असताना कोणतीही दखल घेतली नाही.ना.विखे पाटील यांनी संबंधित खात्यांना सदर जमीन देण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे या जमिनीची पाहणी देखील अधिकारी यांनी केली आहे.ना.विखे पा.यांच्या आदेशानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांनी जिल्हाधिकारी यांना तसे पत्राने कळविले आहे.त्यामुळे वंचित असलेल्या अनेक नागरिकांची घरकुलांची सुविधा ग्रामपंचायत कडे जागा शिल्लक नसल्याने आता ती पूर्तता होणार असल्याने घरकुले मिळणार आहेत.
३० ऑगस्टच्या ग्रामसभेत तसा ठराव मंजू झाला आहे असेही श्री. त्रिभुवन यांनी सांगितले.
नागपूर अधिवेशनात सुद्धा काल ना.विखे पा.यांनी नागरिक व शेती महामंडळ कामगारांना घरकुलसाठी जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close