नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी
दि १४ डिसेंबरपर्यंत दिल्ली येथे चालू असलेले ईपीएस पेन्शनरांचे आमरण उपोषण श्रममंत्री यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. दिल्ली येथे राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने ७ डिसेंबरला रामलीला मैदानावर भव्य असा ऐतिहासिक मेळावा घेण्यात आला होता त्या मेळाव्याच्या अभूतपूर्व यशानंतर सर्वत्र याची जाणीव झाली परंतु निर्णय न झाल्यामुळे ८ डिसेंबरपासून कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते ,सलग ५ दिवस साकळी उपोषण करूनही श्रम मंत्रालयाने दखल न घेतल्याने दिनांक १३ डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते,
या कालावधीमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे ,खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमोल कोल्हे खासदार डॉ. हिना गावित यांनी उपोषणस्थळी येऊन पेन्शनर्सना प्रतिसाद व्यक्त करून संसदेमध्ये हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले,त्याचबरोबर खासदार हेमामालिनी यांनीही सातत्याने पुढाकार घेतला होताच, आजही त्यांनी याबाबतीत प्रकर्षाने पुढाकार घेऊन आपले निवेदन पंतप्रधान पर्यंत पोहोच केले. त्याचबरोबर अर्थमंत्र्यांचीही भेट घेतली आणि श्रम मंत्र्यांचीही भेट घेतली परंतु ही भेट आपल्या शिष्टमंडळाबरोबर व्हावी अशी आपली मागणी होती आणि तीही त्यांनी पूर्णत्वास नेली.कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली सायंकाळी शिष्टमंडळाबरोबर कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांचेशी समक्ष चर्चा झाली आणि त्यांनी हा प्रश्न लवकर सोडवतो असे आश्वासन दिले आहे, राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत ची मुदत देऊन आज सायंकाळी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार आज आमरण उपोषण सुरु होते ते मागे घेण्यात आले, या मध्ये खासदार डॉ. भामरे आणि इतर सर्वांनी आपणास सर्व खासदारांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल संघटनेच्यावतीने आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी सांगितले.
या आमरण उपोषणामध्ये पेन्शनर उपोषणाला १३ तारखेपासून बसलेले होते, त्यामध्ये राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, सौ. मीनाताई राजावत, डॉ. पी.एन. पाटील, सुभाष पोखरकर, भगवंत वाळके, संपतराव समिंदर, दादाराव देशमुख व उत्तर प्रदेश राजस्थान, हरियाणा या राज्यातून प्रत्येकी दोन असे प्रतिनिधींनी सहभाग घेतला .या सर्व आंदोलनांमध्ये ज्या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्व पेन्शनरांसाठी सुभाष पोखरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि श्रम मंत्र्यांच्या आश्वासनानंतर सर्वांनी जल्लोष करून आमरण उपोषण थांबवले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

