साधुसंताचे आध्यात्मिक विचार आणि आचार आत्मसात करणे काळाची गरज-माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे
श्री दत्त जन्म सोहळ्यानिमित्त श्री संत रोहिदास मंदिर या ठिकाणी २१७ सेवेकऱ्यांकडून सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी :
श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह आणि श्री गुरुचरिन्न पारायण सोहळा बुधवार दि. २० डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ संपन्न झाला. त्यानिमित्ताने ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, मंडल स्थापना, अग्निस्थापना, नामजपयज्ञ सप्ताह प्रारंभ, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, नित्य स्वाहाकार, गीताईंग, नित्य स्वाहाकार, स्वामीयाग, नित्य स्वाहाकार, चंडीयागनित्य स्वाहाकार, श्री रुद्रयाग, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
श्री दत्त जयंती निमित्त मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला . या पालखी सोहळ्यात इंदापूर येथील भावी भक्त मोठे संख्येने उपस्थित होते.
. बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे करण्यात आला. सप्ताहचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा-विना वादन सेवा, श्री स्वामी समर्थ मंत्र सेवा, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन सेवा. या सेवेमध्ये पुरुष, महिला व तरूण मुलं, व मुली भाग घेतला होता. माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे सहपत्नीक सुनंदाताई ननवरे यांच्या हस्ते आरती करून श्री संत रोहिदास मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ यांच्य सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच साधुसंताच आध्यात्मिक विचार आणि आचार आत्मसात करणे काळाची गरज आहे असे सप्ताहाच्या प्रारंभ प्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे सांगितले.

