shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर येथे अजय अतुल यांची संगीत मैफिल...!

ज्यांच मन संगीतासाठी बालपणापासूनच उधाण झालं, ज्यांच तन मन संगीतातच रंगल दंगलं आणि बेभानही झालं, अशी एक गायक, गीतकार, संगीतकार भावांची जोडी जिने सर्वांना त्यांच्या तालावर नाचायला भागही पाडलं आणि त्यांच्यात संगीतातून आंतर्मुख व्हायलाही भाग पाडलं. ज्यांच संगीत केवळ भक्तीगीत, लोकगीतापुरतं मर्यादीत राहिलं नाही, तर लावणी, डिजे, अगदी आयटम साँगपर्यंत गेलं. ज्यांनी त्यांच्या संगीतातून इतिहास घडवला, ते म्हणजे अजय – अतुल... अस्सल मराठमोळी जोडी, जिने संपूर्ण भारतात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 


ज्यांनी अनेकदा पूर्वापार चालत आलेल्या काही मर्यादा पार करत अनेक सुमधूर गाणी दिली अशा या दोघा च्या जोडी चा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या श्रीरामपूर नगरीत दिनांक 4/01/2024 रोजी मा.खासदार श्री. सदाशिव लोखंडे साहेब यांच्या वाढदिवस निमित थत्ते गाऊंड येथे दुपारी 4 वाजता होणार असुन त्याचा रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा ...
close