श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील मालुंजे बुद्रुक येथे
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३० भूमिहिन कुटुंबांना जागा उपलब्ध करून देवून आदर्श गृह संकुल वसाहतीचा प्रकल्प माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली उभारणारी मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायत श्रीरामपूर तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
अहमदनगर जिल्ह्याने आदर्श गृह संकुल वसाहतीचे प्रकल्प उभारण्यात देशात नावलौकिक कमावलेला असून अहमदनगर जिल्हा राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीला अहमदनगर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळाला असल्याची माहिती सरपंच अच्युतराव बडाख यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. बडाख यांनी सांगितले की, मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीने ३० बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा मिळवून दिलेला आहे. नदीकाठी वास्तव्य करून राहत असलेले आदिवासी कुटुंबाचे घरात पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. त्यामुळे सदर ठिकाणी रस्ते, भौतिक व नागरी सुविधा निर्माण करणेसाठी अनेक अडचणी निर्माण होत असत. सदर घरकुल योजना राबविण्यासाठी गावठाण नसतांनाही जागेचा प्रश्न सोडवून घरकुल योजना पूर्णत्वास आणली. याकामी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासकीय जागा उपलब्ध करून घेतली व त्यावर ३० घरकुलांचा प्रकल्प उभारला आहे. उर्वरित भुमिहीन लाभार्थी यांच्यासाठी आणखी नविन घरकुल योजना प्रकल्प साकारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती श्री.बडाख यांनी दिली.
या कामासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रकल्प संचालक सुनील पठारे, शाखा अभियंता किरण साळवे, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे, विस्तार अधिकारी विजय चराटे, घरकुल कक्ष प्रमुख दिनकर ठाकरे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) शरद त्रिभुवन, गणेश गोरे, उपसरपंच अंजनीताई रावसाहेब शेंडगे, ग्रामपंचायतीचे सदस्य अण्णासाहेब बडाख, सौ.वेणुताई बर्डे, बाळासाहेब बडाख, दत्तात्रय जाधव, सौ. मिराबाई बडाख, सौ.उज्वला बडाख, किरण गायकवाड, सौ. आशाबाई बडाख, सौ.संगिता बडाख, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव बडाख ग्रामविकास अधिकारी विजयकुमार धाकतोडे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच बांधकाम ठेकेदार श्री.माने यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे भूमिहीन लाभार्थ्यांचे नविन घराचे स्वप्न साकार झाले असल्याचेही श्री.बडाख म्हणाले.
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

