शिरसगांव प्रतिनिधी:
हरेगांवात जिल्हास्तरीय सहृदय संवाद वृद्धमेळावा संपन्न झाला.श्रीरामपूर माणुसकीची भिंत समाजसेवक बाबासाहेब सोनवणे कडुन वृद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ नागरीकांना समाजात महत्वाचे स्थान आहे. परंतु माणसाचा जगण्याचा वेग प्रचंड वाढल्याने वृद्धाच्या समस्यांना कोणी वाली राहिला नाही. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर जीवन व्यतित करणाऱ्या वृद्धांच्या समस्या कोण सोडवणार हे जाणून समाजसेवक बाबासाहेब सोनवणे व श्रीरामपूर माणुसकीची भिंत यांच्या विद्यमानाने तालुक्यातील हरेगांव येथे ह्रदयस्पर्शी वृद्ध संवाद साधण्यात आला. या सामाजिक दायित्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य फा. रोजरिओ होते.
वृद्ध मेळाव्यासाठी जिल्हातून वृद्ध संघटनेची प्रतिनिधी व वृद्ध मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी वृद्धांनी मेळाव्याच्या व्यासपीठावर आपल्या समस्यांना वाट मोकळी करुन दिली. सेवानिवृत्तनंतर आम्ही घरातून फक्त चांगल्या संवादची अपेक्षा करतो परंतु आमच्याशी संवाद साधण्यास कोणी तयार नाही. अनेक वृद्धानी आरोग्याचा प्रश्न मांडले. वृद्ध मेळाव्यात प्राचार्य फा.रोझारिओ म्हणाले की,गेल्या पंधरा वर्षांपासून वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी स्व.सोनवणे गुरुजी प्रिन्सिपल यांनी संत तेरेजा हायस्कुलमध्ये हा वृद्ध मेळावा १६ वर्षांपूर्वी सुरु केला त्याचे संस्कार व वारसा समाजसेवक बाबासाहेब सोनवणे वृद्धमेळाव्याच्या रूपाने पुढे नेत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असुन ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकानी पुढाकार घेण्याची गरज आहे.
कार्यक्रमचे आयोजक समाजसेवक बाबासाहेब म्हणाले
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची सेवा करताना आपले आई -'वडील त्यांच्यामध्ये आपलेसे दिसतात..
ज्येष्ठांच्या समस्या समजुन घेणे हाच ह्या वृद्ध मेळाव्याचा आयोजनचा निस्वार्थ हेतु आहे. वृद्धांशी संवाद साधल्यामुळे
या पुढील समस्या समजु शकल्या,तळागाळातील एखाद्या वृद्ध आईला केलेली मदत व तिने दिलेला तोंडभरून आशीर्वादाचे दोन शब्द मोठे असतात. ती खरी सेवा तो खरा पुरस्कार, बराच तप द्यावा लागतो तेव्हा लोक कळतात
तळागाळातील लोकांची निस्वार्थ सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.
वृद्ध व्यक्तींना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. समाजाला आपल्या कर्तव्याची व वृद्धाना आपल्या हक्काची जाणीव करून देणारा आजचा दिवस आहे.वृद्धव्यक्तींची त्रुटींवर मात करून लढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहनाची आणि विश्वासाची जोड देण्याचा आज वृद्धमेळाव्या निमित्त निर्धार करूया.आई व वडिलांना सन्मान देऊन त्याची सेवा करण्याची शपथ घेऊ या.असे सांगितले मेळाव्यात वृद्धांना आधार असणाऱ्या उत्तम काठ्या देण्यात आल्या.यावेळी प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक, सचिन, रिचर्ड हे धर्मगुरू तसेच माजी सरपंच सुभाष बोधक, सुभाष पंडित, डी. एस. गायकवाड, रमेश पठारे,आदी व वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

