shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशांत दामले यांच्या हस्ते आदित्य नगरकर यांना उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्रदान


श्रीरामपूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर उपनगर शाखेच्यावतीने पुरस्कार विजेत्या कलाकारांचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी सुप्रसिद्ध नाट्य अभिनेते आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते आदित्य नगरकर यांस उत्कृष्ट अभिनय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


याप्रसंगी प्रशांत दामले यांच्या समवेत पी.डी. कुलकर्णी, क्षितिज झावरे, सतीश लोटके,  डॉ. संजयकुमार दळवी, सतीश शिंगटे आणि मोहिनिराज गटने तसेच अ.भा.नाट्य परिषद अहमदनगर उपनगर शाखाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य तथा नाट्य प्रेमी, कलावंत आदि उपस्थित होते.

अहमदनगर येथे नुकत्याच ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातून १६ नाट्य मंडळाने सहभाग नोंदविला होता, त्यात श्रीरामपूर येथील कर्णेज ॲकॅडमी च्या वतीने "परिघ" हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले, त्यात श्रीरामपूर येथील जाणता राजा कलाकार आदित्य विजय नगरकर याने प्रमुख भूमिका उत्कृष्टपणे सादर केली म्हणून उत्कृष्ट पुरुष अभिनय पुरस्कार त्यास जाहीर झाला होता.
या राज्य नाट्य स्पर्धेसाठी श्री. संजय पेंडसे, श्री.सुहास देशपांडे आणि श्रीमती आसावरी शेट्ये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य चे अभिनंदन केले आहे.
श्री.आदित्य नगरकर यांना पुरस्कार जाहीर मिळाल्याबद्दल श्री‌रामपुर येथील सर्व नाट्यप्रेमींनी अभिनंदन केले आहे, श्री.नगरकर यांनी या आधी देखील बरीच नाट्य अभिनय पुरस्कार मिळालेली आहेत.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close