shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदिरानगरमध्ये भक्तिभावात रंगला श्रीगुरुदेव चरित्र पारायण सोहळा...!


श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव भागातील इंदिरानगर येथील श्रीदत्त मंदिरात दत्तजयंतीनिमित्त १९ डिसेंबर पासून श्रीगुरु देवदत्त चरित्र पारायण सोहळा मोठया भक्तिभावात रंगला असून अनेक भक्तगण आणि ग्रामस्थ त्यासाठी सहकार्य करीत असल्याची माहिती संयोजक बाबासाहेब यादव आणि सौ.लताताई यादव यांनी दिली. 



  गेल्या वीस वर्षांपासून इंदिरानगर दत्त मंदिरात सर्वांच्या सहकार्याने श्रीदत्त जयंती सोहळा साजरा केला जातो. देवगड संस्थानचे ह. भ. प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनातून सुरु झालेल्या यावर्षीच्या श्रीगुरुदत्त चरित्र पारायण सोहळ्यास अनेक भक्तमहिला, पुरुषांनी सहभाग घेतला आहे.प्रमिला वाबळे, ज्योती राऊत, सुनीता मोकाटे, मंगला आहेर, कांचन माकोणे, हर्षदाकाकडे, पूजा पवार, शालिनी निघुते, छाया धनवटे, सविता जपे, शालिनी बनकर, सुषमा मराठे, हर्षदा हापसे, संगीता वावशे, अहिल्या कोते, पल्लवी थोरात, अरुणा महापुरे, रंजना मैड, प्रतिभा भोर, रोहिणी पटारे, गीता चव्हाण, शोभा मोरे, सुनंदा कार्ले, सुनीता वाबळे, मीना पाचपिंड, मीना साळुंखे, सुरेश शिंदे, एकनाथ खपके, शकुंतला थोरात,आदिंनी भाग घेतला तसेच अनेक महिलाभक्त मंडळी भजन आणि हरिपाठ कार्यक्रमात सहभागी आहेत.संयोजक   बाबासाहेब यादव, लताताई यादव, योगेश यादव,मंदाकिनी उपाध्ये,सुनंदा वाघमारे, गीतांजली गाढे, डॉ.बाबुराव उपाध्ये आणि श्रीदत्त मंदिर परिवार नियोजन करीत आहेत. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीदत्त जन्म सोहळा व महाप्रसाद प्रसंगी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी-स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close