वारंवार पुकारण्यात येणा-या बंद मुळे होणारी गळचेपी व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहर व्यापारी संघाचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन.
इंदापूर प्रतिनीधी : वारंवार पुकारण्यात येणा-या बंद मुळे होणारी गळचेपी व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मारक ठरणाऱ्या अशा बंदच्या वेळी दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचा नाही असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाने सर्वानुमते घेतला आहे. बंदचे इशारे व व्यापा-यांनी घेतलेला निर्णय याच्या पार्श्वभूमीवर दुकाने, व्यवसाय याचे नुकसान होणार नाही,याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. निर्भय पणाने आमचे व्यापार उदीम चालू रहाणेस सहकार्य करावे अशी विनंती, इंदापूर शहर व्यापारी संघाने निवेदनाद्वारे तहसीलदार,पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. कोणती ही घटना घडल्यास वेगवेगळ्या पक्ष वा संघटना पक्ष निषेध म्हणून शहर बंद चे आवाहन करतात. शहरातील सर्व व्यापारी वर्ग, छोटे व्यापारी, लघु उद्योग, फेरीवाले, पथारी व पदपथावरील छोटे व्यावसायिक यांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे, लघु, मध्यम व्यवसाय असणाऱ्यांचे, दुकानात असणाऱ्या कामगार, मोलमजुरी करणारे बांधव यांचे आतोनात नुकसान होत आहे, असे संघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागील काही वर्षात कोरोना काळ व मागील दसरा, दिवाळी आदि सणावारांच्या दिवशी ही अशाप्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनास संघाने वेळोवेळी निदर्शनास आणून दिलेली आहे. निवेदने ही दिलेली आहेत. तथापि या संदर्भात प्रशासन, सामाजिक संघटना, सर्वच पक्ष यांनी त्याची दखल घेतलेली नाही. येथून पुढे व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणाऱ्या अशा बंद च्या काळात दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचे नाहीत असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. याचा गांभीयनि विचार करुन दुकाने, व्यवसायाचा नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी व निर्भय पणाने आमचे व्यापारउदीम चालू रहाणेस सहकार्य करावे, अशी अपेक्षा निवेदनात शेवटी करण्यात आली आहे. निवेदनाखाली इंदापूर शहर व्यापारी संघाने अध्यक्ष भरत शहा,उपाध्यक्ष संदीप वाशिंबेकर,सचिव मेघःश्याम पाटील, सहसचिव दिलीप कासार यांच्या सह्या आहेत.

