shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उघड्या डोळ्यांनी लादलेला आजार : कॅन्सर :

आता आपणच बदलू या. लेख १० वा
दिनांक १३/१२/२०२३


WHO ने जाहीर केलेल्या निवेदनानुसार १) दुधातील भेसळीने ८५% भारतीयांना कॅन्सर होणार आहे,   २) चॉकलेट नि पावामुळे कॅन्सर होतो.
ही दोन्ही निवेदने लहान मुलांशी संबंधित आहेत. याशिवाय दैनंदिन जीवनात मुले कॅन्सरच्या जबड्यात ढकलली जात आहेत.

 शाळांमधून रोज वाढदिवस साजरे होतात नि बहुतांश वेळी चॉकलेट वाटली जातात. म्हणजे मुलांना घरी चॉकलेट खायला नाही मिळाले तरी शाळेत ते मिळतेच. काही शाळा यास अपवाद असतीलही.
मी गेली ६ महिने शाळाशाळांतून फिरतोय. शाळांमध्ये शासनाकडून पोषण आहार दिला जातो. सर्व मुले हा आहार आनंदाने खातात. घरी न जेवणारी हट्टी मुले एकमेकांशी गप्पा मारत खिचडी खातात. ही योजना चांगली आहे . मात्र मुलांसाठी खिचडी बनवावयाचे भांडे हे ऍल्युमिनियम धातूचे असते. हा धातू आरोग्यासाठी घातकच आहे. दररोज मुलांना आपणच उघड्या डोळ्यांनी कॅंसरकडे घेऊन जात आहोत.  वास्तविक खिचडी शिजविण्यासाठी आरोग्यदायी वापरावयाचे भांडे पितळेचे अथवा स्टीलचे असावे. पोषण आहाराच्या माध्यमातून नवीं पिढी कॅंसरकडे चाललेली आहे असे माझे अवलोकन आहे. 
आता आपणच बदलायला हवे.


देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने
मोबाईल : ९८८१३७३५८५
close