श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी केंद्रीय माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने
यावेळी युवा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून यामध्ये विविध स्पर्धा - अंतर्गत मॅरेथॉन, प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची, स्लो सायकलिंग, कॉमर्स फुड फेस्टिवल तसेच पथनाट्य स्पर्धा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, रोजगार मेळावा असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या सर्व स्पर्धांचे उद्घाटन रयत शिक्षण संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने यांच्या हस्ते करण्यात आले, प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ सुहास निंबाळकर , उपप्राचार्य डॉ. सय्यद एस.बी. विभाग प्रमुख डॉ.केकाने तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, पर्यवेक्षक प्रा. विजय दळवी , समन्वयक प्रा. श्रीमती तसनीम शेख, संस्थेच्या सहकार्याने सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे. तथा सर्व विद्यार्थ्यांना स्टॉफचे मार्गदर्शनही लाभत आहे.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

