shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरळगाव विभाग हायस्कूलने विज्ञान प्रदर्शनात यशाची परंपरा राखत द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला

सौरभ कामडी - पालघर
सेवा सहयोग फौंडेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या धसई जवळील मढ येथील शासकीय आश्रम शाळा येथील २ दिवसीय विज्ञान प्रदर्शनात सरळगांव व धसई पंचक्रोशीतील एकूण १८ शाळांनी सहभाग नोंदवत ३४ मॉडेलनी प्रात्यक्षिक सादर केले. 


यामध्ये सरळगांव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगांव यांनी मागील वर्षाची परंपरा कायम राखत या ही वर्षी मोठया गटात इयत्ता ८ वी ड च्या कु. डेविड भगवान मोहपे व कु. गौतमसिंग नरापतसिंग राजपूत यांनी collapse red alert व मोठया गटात कुमारी. समीक्षा गवाळे  हिने Hydroelectricity ही प्रतिकृती सादर करत  विद्यालयाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.सदर प्रतिकृतीसाठी विज्ञान शिक्षक जगन बोरसे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, सलग दुसऱ्या वर्षीही विज्ञान प्रदर्शनात शाळेची गुणवत्ता व यशस्वीतेमूळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर यशस्वी विद्यार्थी व विज्ञान शिक्षक बोरसे सर यांचे विद्यालयाचे प्राचार्य जी.ओ.माळी सर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.


*पत्रकार सौरभ कामडी - पालघर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन: 
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close