shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कु.शुभश्री पोतदार हिचा सत्कार*

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कु.शुभश्री पोतदार हिचा सत्कार*
   - सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेसाठी श्री. नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी कु.शुभश्री पोतदार हिचा महाराष्ट्राच्या टीम मध्ये निवड
     इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री. नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर या शाळेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कुमारी शुभश्री श्रीकांत पोतदार हिने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कोची, केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय (नॅशनल) स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीम मध्ये तिची निवड झाली आहे.संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कु.शुभश्री पोतदार व पालकांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
   यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव,उपाध्यक्ष सत्यशील पाटील, ज्येष्ठ नेते कालिदास देवकर ,भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार, शाळेच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख ,श्रीकांत पोतदार ,शुभदा पोतदार उपस्थित होते.
close