आमदार दत्तात्रय भरणे यांचा रस्त्यासाठी ३ कोटींचा निधी मंजुर केल्याबद्दल चाकाटी ग्रामस्थांनी सत्कार करून मानले आभार.
इंदापूर प्रतिनिधी: नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात पुरवणी बजेट मध्ये इंदापूर तालुक्यातील चाकाटी ते बोराटवाडी ते महादेव मार्ग रस्ता 3 कोटींचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्यानंतर. माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी निधी मंजूर केल्याबद्दल चाकाटी गावातील ग्रामस्थांच्या वतीने भेट घेऊन सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष नवनाथ रूपनवर ,चाकाटी गावचे सरपंच संजय रुपनवर , केशव (काका) मारकड, ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब मारकड,बापु मारकड पाटील ,सोपान मारकड, बापु हांडे ,गणपत मारकड ,राजेंद्र बंडगर इत्यादी मान्यवर होते.

