shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किणिस्ते केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथे संपन्न..!


*सौरभ कामडी - पालघर* 
मोखाडा - किणिस्ते केंद्राच्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा  जिल्हा परिषद आई. एस.ओ. शाळा कोचाळे येथे पार पडल्या. याप्रसंगी मोखाडा तालुका उपसभापती प्रदिप वाघ,कारेगांव कोचाळे ग्रामपंचायत सरपंच मुरलीधर कडू,उपसरपंच हनुमंत फसाले,वाकडपाडा ग्रामपंचायत उपसरपंच नंदकुमार वाघ तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर चे प्राचार्य डॉ. संजय वाघ आणि किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख नागू वीरकर आदि उपस्थित होते. केंद्रातील नऊ शाळांमधील दोनशे  विद्यार्थ्यांनी समुहगान, मोठा गट, समुहगान लहान गट, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, आणि नाट्य या स्पर्धांमध्ये  सहभाग घेतला होता , नाट्य आणि वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते माझ्या स्वप्नातील पालघर जिल्हा आणि स्वच्छ सुंदर पालघर जिल्हा या विषयावर. जिल्हा परिषद शाळा कोचाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकास आणि भाषणास प्रथम क्रमांक मिळाला, उपसभापती प्रदिप वाघ आणि डॉ. संजय वाघ यांनी विद्यार्थ्यासाठी संवाद साधून मार्गदर्शन केले.

स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाळे व करोळ शाळेने सर्व प्रकारात यश संपादन केले . स्पर्धेचे परीक्षक म्हणून कारेगाव आश्रमशाळेचे शिक्षक आहिरे सर , भडगावकर  सर आणि कर्पे सर यांनी निकोप परीक्षण केले .  स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रसंगी करोळ पाचघर ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र येले, हनुमंत फसाळे भरत गारे गुरुजी  उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोचाळे शाळेचे मुख्याध्यापक  दिनकर फसाळे सर राजाराम जोशी सर,दिनेश ठोमरे सर व शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे यांनी मेहनत घेतली आहे.

*पत्रकार सौरभ कामडी - पालघर*
*सहयोगी
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close