shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलचा सोळावा सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न.

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलचा सोळावा सांस्कृतिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न.

शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा ( भिगवण प्रतिनिधी: सागर घरत)
दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल या विभागामध्ये अविष्कार या नावाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  प्राध्यापक रामदास झोळ  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक  लालासाहेब जगताप, बारामती येथील प्रसिद्ध डॉ. सतीश पवार हे उपस्थित होते. 
यावेळी वेगवेगळ्या खेळांमध्ये कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
अध्यक्षीय भाषणात प्रा. रामदास झोळ  यांनी पुढील जीवनामध्ये बुद्धी आणि ज्ञानाशिवाय पर्याय नाही असे सांगितले.  पाठीमागील दहा वर्षापासून आपण करत असलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या  शासन दरबारी करत असलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे असे त्यांनी सांगितले. उद्याच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे म्हणजे जगाच्या पाठीवरती आपण कोठेही आपल्या बुद्धिमत्तेची
छाप पाडू शकतो.
 यावेळी व्यासपीठावरती संस्थेचे अध्यक्ष  प्रा. 
रामदास झोळ,  संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी,  सचिव  माया झोळ, सदस्य धनंजय  अडसूळ,  डॉ. सतीश पवार, सौ.पवार, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. विशाल बाबर, दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलचे  संचालक सौ नंदा ताटे, ज्युनिअर कॉलेज प्राचार्य सिंधू यादव  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभाग प्रमुख सौ संगीता खाडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार जुनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र धेंडे यांनी मानले.
close