shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार महामंडळ कागदावरच....अंमलबजावणीसाठी वडार समाज संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

लातूर/ प्रतिनिधी :
        वडार समाजातील युवकांना उद्योग व्यवसायात उन्नती करण्यासाठी आर्थिक लाभ व्हावा तसेच वडार समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाकडे वळावा, त्यांना आर्थिक वृद्धीसाठी वडार समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह अनेक प्रलंबित मागण्या शासन स्तरावर मार्गी लागावे, यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याचेच फलित म्हणजे ९ ऑगस्ट २०२३ रोजी शासन स्तरावर पञक काढून तत्वत: मान्यता दिली असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी मुख्यमंत्र्यांडे निवेदनाद्वारे केली आहे. 

     यावेळी श्रीकांत मुद्दे म्हणाले की, २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंञी व सध्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वडार समाज महामेळाव्यात आर्थिक विकास महामंडळास ५० कोटीसह विविध घोषणांचा पाऊस पाडला परंतु त्याची अंमलबजावणी माञ कुठेच झाली नाही. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आले, मात्र सरकार या मागण्यांकडे का दुर्लक्ष करत आहे काही कळत नाही.
     आजपर्यंत वडार महामंडळाला ना कार्यालय, ना खुर्ची-टेबल, ना निधी मिळाला आहे. केवळ अश्वासन आणि घोषणा याव्यतिरिक्त वडार समूहाला काही मिळताना दिसत नाही. 
   वडार समाजातील तरूणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या वडार आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच शासन स्तरावर वडार समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्या मार्गी लावावे, असे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष श्रीकांत मुद्दे यांनी केले आहे. या प्रसंगी लातूर जिल्हाध्यक्ष रमाकांत मुद्दे, तालुकाध्यक्ष भिमाशंकर बंडगर, अंकुश तांदुळे, सचिन वाडीकर, बालाजी भांडेकर, अशोक शेल्हाळे, अनिल भांडेकर आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


close