shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव हजारो भाविकांच्या मांदियाळी मध्ये उत्साहात संपन्न.

इंदापुरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव हजारो भाविकांच्या मांदियाळी मध्ये उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधि: श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त इंदापूर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव हजारो भाविकांच्या मांदी अळीमध्ये उत्साहात संपन्न झाला.
 इंदापूर शहरात श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर या ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा दि. २० डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान पार पडला. यामध्ये आरती, पारायण, नित्यसेवा, भजन अशी सेवा या ठिकाणी पार पडली. दि. २६ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्म उत्सवानिमित्त सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जावीर सर यांच्या समूहाच्या वतीने भजन करण्यात आले . यानंतर ६ वाजता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाच्या जयघोषात श्री दत्त जन्म निमित्त फुले टाकण्यात आली. याप्रसंगी हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जन्म पाळणा गायण्यात  आला. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी स्वामीभक्त कांतीलाल उर्फ बाळासाहेब कोकाटे यांच्या वतीने देण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ इंदापूर ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले होते. या सोहळ्यास हजारो भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close