shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यादव परिवाराने २० वर्षांपासून श्रीदत्त भक्तीचा आदर्श निर्माण केला =डॉ. बाबुराव उपाध्ये*


*इंदिरानगरमध्ये विविध उपक्रमांनी
श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीदत्त भक्ती ही भारतीय संस्कृतीची मूळ विचारधारा असून श्रीगुरुचरित्रामध्ये प्रत्येक वस्तूत ज्ञानशक्तीभक्तीचे विचारसूत्र आहे, ह्या श्रीदत्त भक्तीचा आदर्श इंदिरानगरमधील यादव परिवाराने गेल्या २० वर्षांपासून पंचक्रोशीत निर्माण केला असल्याचे मत संतसाहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. 
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर शहरालगतच असलेल्या शिरसगांव भागातील इंदिरानगर येथील श्रीदत्त मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त १९ ते २६ डिसेंबर २०२३ या काळात विविध उपक्रमांनी श्रीदत्त जयंती साजरी झाली, त्याविषयी मत व्यक्त करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.


श्रीदत्त मंदिर प्रमुख बाबासाहेब यादव, सौ. लताताई यादव,योगेश यादव व परिवाराने सर्वांच्या सहकार्याने श्रीदत्त जयंतीनिमित्त जन्मसोहळा साजरा केला.श्रीदत्त चरित्र पारायण सोहळा मोठया भक्तिभावात सात दिवस झाला. सौ.लताताई यादव यांनी स्वागत करून सांगितले की, देवगड श्रीदत्त संस्थानचे गुरुवर्य ह.भ. प.भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते गेल्या २० वर्षांपूर्वी श्रीदत्तमंदिर उभारणी व श्रीदत्तचरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला. शिरसगांव ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक यांचे सहकार्य लाभत आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळ,शिवकृपा महिला भजनी मंडळ, श्रीदत्त भजनी मंडळ, इंदिरानगर युवा ग्रुप,           श्रीतुळजाभवानी महिला मंडळ इत्यादिंनी उपक्रमात खूप  सहकार्य केले. श्रीपैठणेगुरु यांच्या    संयोजनाखाली विधिवत       श्रीदत्तजन्म सोहळा संपन्न झाला. योगेश यादव, सौ. रुपाली यादव, सौ. हर्षदा काकडे, अक्षदा काकडे यांनी पूजाविधी व आरतीत सहभाग घेतला.डॉ. बाबुराव उपाध्ये पुढे म्हणाले की, , प्राणीरक्षक आणि निसर्गपूजक असणारे हे दैवत जन्म -जीवन - मृत्यूचे सारसूत्र असून श्रीगुरुचरित्राचे तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे.ब्रह्म, विष्णू, महेश्वर ही त्रिमूर्ती म्हणजे  मानवी जीवनाचा अमृतकुंभ आहे.श्रीदत्त हे सद्गुरू होते. श्रीगुरुदत्त चरित्र पारायण सोहळ्यास अनेक भक्तमहिला, पुरुषांनी सहभाग घेतला.त्यामध्ये लताताई यादव, प्रमिला वाबळे, ज्योन्साताई  राऊत, सुनीता मोकाटे, मंगला आहेर, कांचन माकोणे, हर्षदा काकडे, पूजा पवार, शालिनी निघुते, छाया धनवटे, सविता जपे, शालिनी बनकर, सुषमा मराठे, हर्षदा हापसे, संगीता वावशे, अहिल्या कोते, पल्लवी थोरात, अरुणा महापुरे, रंजना मैड, प्रतिभा भोर, रोहिणी पटारे, गीता चव्हाण, शोभा मोरे, सुनंदा कार्ले, सुनीता वाबळे, मीना पाचपिंड, मीना साळुंखे, सुरेश शिंदे, एकनाथ खपके, शकुंतला थोरात यांनी भाग घेतला तसेच अनेक महिलाभक्त मंडळी भजन आणि हरिपाठ कार्यक्रमात सहभाग घेतला.संयोजक   बाबासाहेब यादव, लताताई यादव, योगेश यादव,मंदाकिनी उपाध्ये,सुनंदा वाघमारे, गीतांजली गाढे,लक्ष्मी गाढे, डॉ.बाबुराव उपाध्ये, सचिन निघुते, बबलू उर्फ संतोष पवार आदिंनी सात दिवसाच्या नियोजनात भाग घेतला.तसेच राधाबाई पालवे, देवताबाई बर्वे, उषाताई जगताप, मंगल वेताळ, रंजना जायभाये, ताराबाई दानवे, शकुंतला थोरात, मंगल उगले, अरुणा जोर्वेकर, सुनीता मोरे, कु.भूमिका  देवऱे आदिंनी भजन गाण्यात भाग घेतला.श्रीदत्त जन्मसोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेश मुद्गुले,नगरसेवक रवी पाटील,डॉ. शिवाजी काळे, माजी तहसीलदार गुलाबराव पादिर, प्रा.बाळासाहेब बोर्डे, पत्रकार राजेंद्र देसाई, बाळासाहेब तनपुरे, लेविन भोसले,प्रा. सौ. पल्लवी नंदकुमार सैंदोरे,सुभाष लिंगायत, प्रा.लोंढे,सुभाष वाघुंडे, सो. कल्पनाताई वाघुंडे आदिंनी शुभेच्छा दिल्या.
हजारो भक्तगण, पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसाद घेतला. आनंद व्यक्त केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपक्रमाचे उपस्थितांचे कौतुक केले तर बाबासाहेब यादव यांनी सर्वांचे आभार मानले.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close