मखदूम सोसायटीच्या कौमी एकता सप्ताह हा कौतुकास्पद उपक्रम - हाजी शौकतभाई तांबोळी
अहमदनगर प्रतिनिधी:
देशाच्या भवितव्यासंबंधी असणारे शुभचिंतक आणि विवेकशील लोकांना प्रखरतेने याची जाणीव झाली आहे की आमचा प्रिय भारत देश यावेळी अनेक समस्यांनी होरपळून निघत आहे. त्याला काळजी वाटते की वेळीच या विद्वेषी प्रवृत्तीला प्रतिबंध घातले गेले नाही तर परिस्थिती फारच चिंतनीय होऊ शकते. यापासून देशवासीयांना वाचविण्यासाठी मखदूम सोसायटीच्यावतीने कौमी एकता सप्ताह हा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असाच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकतभाई भाई तांबोळी यांनी केले.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, मराठा सेवासंघ व रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कौमी एकता सप्ताह अंतर्गत रहमत सुलतान हॉल येथे सदभावनेसाठी महेफिले मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकतभाई तांबोळी यांच्या हस्ते मुशायरा कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. औरंगाबाद येथील प्रसिद्ध शायर कवी लेखक मिर्झा असलम बेग यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष के.के. खान, चांद सुलताना हायस्कूल चे माजी प्राचार्य कादिर सर यांच्या समवेत मखदूम सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरूर, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील,सचिव निसार बागवान, आबीद दुलेखान, आसिफ सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुशायऱ्याची सुरुवात पवित्र कुराण पठणाने करण्यात आली. यानंतर नफीसा हया यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण करताना म्हटले की युसूफ का कौन है वो खरीदार देखकर, मै आ रही हू मिस्र का बाजार देखकर, या नाजुक शैलीच्या कवितेने रसिकांची भरभरून दाद मिळविले. याच वातावरणाला पुढे नेत आसिफ सर म्हणाले की..या खुदा अब तो मुंसीफी भी खो गयी, झुट तो सच के बराबर आ गया या कवितेने रसिकांची वाह वाही घेतली. या परिस्थितीत मुशायऱ्याला याच वातावरणात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी एक अनुभवी कवी सय्यद खालील यांनी पार पडताना म्हणाले... आस्तीं खलील तुम झटक भी चुके, कितने सांप आस पास है अभी, या शायरीने रसिकांच्या टाळ्यांनी हाॅल गुंजत होता. याला पुढे नेताना बिलाल अहमदनगरी यांनी मांडले की.. बुढापे मे हमारे कदम डगमगाए, कोई समजा के हम पी कर आये, या सत्यावर आधारित कवितेने लोकांची वाहवाई मिळविली. यानंतर कमर सुरूर यांनी आपल्या रचना सादर करताना म्हणाले की.. ईद होली हो दिवाली हो या रक्षाबंधन, सारे तहवार मोहब्बत के लिये होते है, एक कमजोर से धागे ने बताया है कमर... भाई बहनों की हिफाजत के लिए होते है. या राष्ट्रीय एकात्मता व भाऊ बहिणीच्या नात्यावरच्या कवितेने रसिक एकदम मंत्रमुग्ध झाले. मुंबई येथील कवी शहजान वसीम म्हणाले की उसके आने से मेरी हर बात झूट हो गई, मेरा तो पता नही मगर वो बदनाम हो गई या कवितेने ही रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुशायराचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष असलम मिर्झा यांनी आपली कविता सादर करताना म्हणाले की.. मैने चंद अल्फाज क्या लिखे तेरी तारीफ मे,अब गले पड जायेंगे सारे के सारे देखना या कवितेने मुशायाऱ्याने गोड व प्रेमळ समारोप झाला. याव्यतिरिक्त मुशायऱ्यामध्ये अशफाक शेख, सुलेमान अहमदनगरी, अर्क अहमदनगरी, सलीम यावर, शरीफ खान, मुन्नवर हुसैन यांनीही आपल्या एकापेक्षा एक चढावढ कविता सादर करून मुशायऱ्यामध्ये वाह वाह मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद खलील यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. कमर सुरुर यांनी केले. आभार निसार बागवान यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी, रहेमत सुलतान फाउंडेशन, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मुस्कान फाऊंडेशन, अलकरम सोसायटी, मराठा सेवा संघाचे सर्व सदस्यांनी व युनुस तांबटकर, तन्वीर चष्मावाला, आरिफ सय्यद, शफकत सय्यद, राजु शेख, एफ एन ब्रदर्स, अयाज गफुर, जावेद तांबोळी,जावेद मास्टर आदींनी परिश्रम घेतले.
*ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

