श्रीरामपूर प्रतिनिधी:
सध्याचे सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी श्रीरामपूर शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करून निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्यावतीने नायब तहसीलदार अमोल एडके यांनी निवेदन स्वीकारले, यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी सांगितले की, सध्याचे सरकार ने दुधाचे भाव पाडले आणि दुर्दैव हे की या खात्याचे दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या जिल्ह्यातील आहेत तरीही शेतकऱ्यांची ही अवस्था. आज दुधाचे भाव २५ ते २८ रुपये लिटर झाली आहे.
ज्याठिकाणी पाण्याची बाटली देखील वीस रुपयाला विकली जात आहे. त्या ठिकाणी दुध दराची काय अवस्था करुन ठेवली आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुर्ता प्रचंड अडचणीत आलेला आहे, याकरीता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि विद्यमान राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांना दूध भाव वाढवून देत दिलासा द्यावा अशी मागणी श्री .बढदे त्यांनी केली. तसेच सध्याच्या काळात दूध भेसळ प्रचंड वाढली आहे त्याकडेही सरकारचे प्रचंड दुर्लक्षित असून सरकारकडूनच त्यांना राजाश्रय दिले जात असल्यामुळे दुधाचे भाव पडले हेही एक मोठे कारण यावेळेस त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख लखन भगत यांनी सांगितले की, आत्ताच कुठे शेतकऱ्यांना कांद्याच्या माध्यमातून थोडे पैसे मिळायला सुरुवात झाली होती परंतु सरकारने निजामशाही सरकार निर्णय लागू करून निर्यात बंदी केली आणि पुन्हा शेतकरी अडचणीत आला, म्हणजे हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे.
यावेळी तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, शेतकरी नेते सदाशिव पटारे यांनी पिक विमा आणि सोयाबीन चे रखडलेले अनुदान यावर सरकारवर ताशेरे ओढले.
या वेळी उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, तालुकाप्रमुख लखन भगत, शहर प्रमुख रमेश घुले, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, शेतकरी नेते सदाशिव पटारे, मच्छिंद्र पटारे, वाहतूक सेना शहर प्रमुख यासीन सय्यद, ॲड.सुभाष जंगले, ॲड. श्याम खर्डे, महंताजी यादव ,शिव अंगणवाडी जिल्हाप्रमुख शारदाताई कदम ,अनुराधा आहेर, शांताबाई सुतार ,लताबाई गुडदे खंडेराव पठारे, उप शहर प्रमुख रोहित भोसले, शहर सचिव राहुल रणधीर, तालुका संघटक किशोर ढोकचौळे, संदीप जगधनी, दीपक होले ,स्वप्नील साबळे ,शरद केडे, दिनेश पोपळघट स्वप्निल काळे ,नवनाथ गोरे, प्रवीण शिंदे, महेंद्र खैरे, शुभम रणधीर, सागर हारके, शिवाजी सिनारे, राधाकिसन डांगे, किशोर फाजगे, सुरेश बारस्कर, अप्पासाहेब गायकवाड,रामशेठ अग्रवाल, शिवाजी दौंड, एकनाथ गुलदगड, वाल्मीक ढोकचौळे, नवनाथ ढोकचौळे,अजित गुंजाळ सतीश जाधव, अण्णा खैरे, केशव जेजुरकर, अर्जुन गोरे, विशाल भालेराव, कैलास वाकडे, अमोल पवार, नवनाथ साळुंखे, सागर शिरसाठ, गोरख सदाफळ यांच्यासह अनेक मान्यवर शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

