shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर्मळ पिंपरी दलित कुटुंब अत्याचार प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करुन कठोर कारवाई करावी,अन्यथा भीमशक्ती चे उपोषण - संदीप मगर


श्रीरामपूर प्रतिनिधी:
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील दलित समाजाच्या घरावर हल्ला करणाऱ्या जातीवादी समाजकंटक गावगुंडांवर कलम ३०७, लहान मुलींना व महिलांना मारहाण प्रकरणी पोस्को अंतर्गत कारवाई तसेच जाळपोळ केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करून सर्व फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करावी अन्यथा आपल्या पोलिस कार्यालयासमोर दि.१९ डिसेंबर पासून उपोषण छेडले जाईल असा गंभीर इशारा भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मगर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच शिर्डी विभागाचे डी वाय एस पी संदीप मिटके यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


यावेळी भीमशक्ती महाराष्ट्र संघटक सिमोन जगताप, भीमशक्तीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई बारसे, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, राहुरी तालुका अध्यक्ष यासीन सय्यद, महिला अध्यक्षा कल्पना तेलोरे, शहराध्यक्षा वंदनाताई गायकवाड,  उपाध्यक्षा जयश्री पवार आदि उपस्थित होते.
 सदरील प्रकरणी भीमशक्ती चे संस्थापक माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी संबंधित अत्याचार ग्रस्त कुटुंबाशी फोन कॉलद्वारे चर्चा करत धीर देवून सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल असे सांगितले.


पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close